शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग यशस्वी; पाथर्डीच्या पूर्व, दक्षिण भागात पडला दमदार पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 19:04 IST

जोरदार झालेल्या पावसाने पाथर्डी तालुक्यात समाधान व्यक्त होत आहे.

पाथडी(अहमदनगर) : पाथर्डी तालुक्यातील पूर्व, दक्षिण भागात कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग यशस्वी झाला. बुधवारी सायंकाळी चार वाजता कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी विमानांनी ढगांवर रसायनाची फवारणी केली. त्यानंतर दमदार पावसाने हजेरी लावली आहे. दीड तास झालेल्या या पावसाने तालुक्यातील बंधारे ओसंडून वाहिले आहेत.

यंदा जूननंतर समाधानकारक पाऊस पडला नाही. जूनच्या सुरुवातीला झालेल्या थोड्याफार पावसामुळे शेतकऱ्यांनी कपाशी, बाजरी, मका आदी पिकांची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली. मात्र तालुक्यातील पश्चिम भागात अद्यापही दुष्काळ कायम  असून अद्याप पाऊस पडलेला  नाही. त्यामुळे तालुक्यामध्ये पावसाअभावी शेतकरी संकटात सापडला आहे. 

पावसाअभावी पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शासनाने कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी औरंगाबाद येथील विमानतळावरून तालुक्यात प्रथमच कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पाथर्डी शहरावरील जमा झालेल्या ढगांवर सुमारे एक तास विमानातून रसायनाची फवारणी करण्यात आली. परंतु वाऱ्याचा वेग जास्त प्रमाणावर असल्यामुळे रसायनांची फवारणी केलेले ढग मोहटा गावापासून पूर्व बाजूला सरकले. परंतु यामुळे मात्र करोडी, तिनखडी, मोहटा, कोरडगाव, भिलवडी, मोहजदेवढे, पिंपळगाव, टाकळीमानूर तसेच बीड  जिल्ह्यातील शिरूरपर्यंत या प्रयोगामुळे दमदार पावसाची सुरुवात झाली होती. 

कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी झाल्याने येत्या कालावधीत अशा स्वरूपाचा प्रयोग पाथर्डी तालुक्यातील दुष्काळ हटवण्यासाठी राबवण्याची मागणी तालुक्यातील शेतकरी वर्गातून होत आहे. याबाबत तहसील प्रशासनाकडे कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती. दरम्यान जोरदार झालेल्या पावसाने पाथर्डी तालुक्यात समाधान व्यक्त होत आहे.

औरंगाबादच्या विमानांनी पाडला पाऊसकृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी बुधवारी तासभर जालना आणि अहमदनगर जिल्ह्यात विमानाने  उड्डाण घेतले. ३९ एरोसोल्सच्या माध्यमातून रसायनांचा फवारा पाणी असलेल्या ढगांमध्ये करण्यात आला. कोरडगाव (पाथर्डी, अहमदनगर), मोहरी (पाथर्डी, अहमदनगर) पाथर्डी,  अमरापूर (शेवगाव, अहमदनगर) अशा ठिकाणी फवारणी करण्यात आली. विमानाने दुपारी ३ वाजून ५६ मिनिटांनी उड्डाण घातले आणि हे विमान सायंकाळी ५ वाजून ५० मिनिटांनी औरंगाबाद विमानतळावर उतरले.

बुधवारी १९ ठिकाणी ३८ नळकांड्या फवारण्यात आल्या. सी-डॉप्लर रडारवर पाणीदार ढगाच्या इमेज दिसल्यानंतर दुपारी वैमानिकाला उड्डाणाचे आदेश देण्यात आले. वैमानिक आणि सहवैमानिकांनी आदेशानुसार उड्डाण घेत प्राप्त माहितीनुसार फवारणी केली.  विमानाने ज्या ठिकाणी प्रयोग केला, त्याचे फोटो तसेच व्हिडिओ तेथील शेतकºयांनी विभागीय आयुक्तालयातील अधिकाºयांना पाठविल्याचे नोडल ऑफिसर तसेच विभागीय उपायुक्त सतीशकुमार खडके यांनी सांगितले. 

मराठवाड्यातील कमी पर्जन्यमान असलेल्या भागांत कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यासाठी ९ तारखेपासून सुरूवात झाली. बुधवारी प्रयोगाचा तेरावा दिवस होता. या तेरावा दिवसांत फक्त चार दिवस विमान प्रयोगासाठी हवेत झेपावले. मंगळवारी विमानाने घनसावंगी परिसरात रसायनांची  (६ एरोसोल्स) फवारणी केली. मंगळवारी पाऊस झाला नाही,  मात्र बुधवारी केलेल्या प्रयोगाने अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगाव तालुक्यात चांगलाच पाऊस बरसला.

टॅग्स :Rainपाऊसdroughtदुष्काळ