शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दीड वर्षापूर्वी गुन्हा दाखल केल्याच्या कारणावरून मुकादमावर गोळीबार, दोघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 15:40 IST

जामखेड (जि . अहमदनगर) : दीड वर्षांपुर्वी जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याच्या कारणावरून जामखेड तालुक्यातील पाटोदा (गरडाचे) येथे ...

जामखेड (जि . अहमदनगर) : दीड वर्षांपुर्वी जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याच्या कारणावरून जामखेड तालुक्यातील पाटोदा (गरडाचे) येथे मुकादमावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात मुकादमाच्या पायाला गोळी लागून जखमी झाले आहेत. त्यांनाला पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे पाठविण्यात आले आहे. गोळीबार करणारे दोन आरोपी फरार असून त्यांच्यावर जामखेड पोलीस स्टेशनला जीवे मारण्याचा प्रयत्न व आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध नगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व जामखेड पोलीस लक्ष ठेवून आहेत.     याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की घटनेतील फिर्यादी आबेद बाबुलाल पठाण (रा. गरडाचे पाटोदा ता. जामखेड) हे ऊसतोड कामगारांचे मुकादम आहेत. याच्याकडे लक्ष्मण कल्याण काळे (रा.जामखेड) हा ऊसतोड मजुर कामाला होता. सदर मजुर लक्ष्मण काळे यास आर्थिक कारणावरून दिड वर्षांपुर्वी यातील आरोपी अक्षय उर्फ (चिंग्या) विश्वनाथ मोरे (रा. पाटोदा गरडाचे) याने मारहाण केली होती. म्हणून दिड वर्षां पुर्वी जामखेड पोलीस स्टेशनला अक्षय मोरे विरोधात तक्रार नोंदवली होती.

याचाच मनात राग धरून दि ३ मार्च रोजी रात्री एक वाजता आरोपी अक्षय ऊर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने फिर्यादी आबेद पठाण यांच्यावर तीन राऊंड फायर केले. यामध्ये एक गोळी आबेद पठाण यांच्या पायाला लागल्याने ते या गोळीबारात जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने नगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गोळीबार झाल्यावर आरोपी एका कलाकेंद्र चालकाच्या नातेवाईकाची गाडी घेऊन फरार झाला आहे. त्यामुळे  पोलिसांनी सध्या चौकशीसाठी दोन जणांना ताब्यात घेतले आहेत.

सदर घटनास्थळी तातडीने अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी भेट दिली. आरोपीच्या शोधासाठी तीन पथके तैनात करण्यात आली असुन लवकरच आरोपीला पकडण्यात येईल अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी दिली. पुढील तपास सपोनि गौतम तायडे हे करत आहेत. 

दुहेरी हत्याकांडातील आरोपी

मुकादमावर गोळीबारातील आरोपी अक्षय ऊर्फ (चिंग्या) विश्वनाथ मोरे हा 2018 साली राळेभात बंधुच्या दुहेरी हत्याकांडातील त्यावेळी अल्पवयीन आरोपी होता व निर्दोष सुटला होता.  सदर आरोपी हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असुन त्याच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी