आगीत किराणा दुकान, घर खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:19 IST2021-03-21T04:19:52+5:302021-03-21T04:19:52+5:30
केडगाव : गुंडेगाव (ता. नगर) येथे भरवस्तीत असलेले व्यावसायिक उत्तम पिंपरकर यांच्या किराणा दुकानाला व ...

आगीत किराणा दुकान, घर खाक
केडगाव : गुंडेगाव (ता. नगर) येथे भरवस्तीत असलेले व्यावसायिक उत्तम पिंपरकर यांच्या किराणा दुकानाला व राहत्या घराला पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण दुकान व घर जळून खाक झाले. ही आग शॉर्टसर्किटने लागली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भरवस्तीत असलेल्या किराणा दुकानाला व घराला आग लागून संपूर्ण दुकान जळून खाक झाले.
अथक परिश्रमांनंतर आग विझविण्यात गावातील युवकांना यश आले. या घटनेत लाखोंचे नुकसान झाले असून, ही आग पहाटेच्या सुमारास शॉर्टसर्किटने लागली असण्याची शक्यता आहे.
या जळीत किराणा दुकानाचा व घराचा गुंडेगावचे तलाठी भाऊसाहेब गौडा यांनी प्राथमिक पाहणी करून पंचनामा केला असून, अंदाजे पावणेनऊ लाखांचे नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. आमदार बबनराव पाचपुते यांनी जळितांची विचारपूस करीत माहिती घेतली.
गुंडेगावचे उपसरपंच संतोष भापकर, संजय कोतकर, मंगेश हराळ, संतोष सकट, संतोष कोतकर, शिवनाथ कोतकर, संदीप धावडे, विशाल पिंपरकर, शैलेश पिंपरकर, संजय भापकर यांच्या उपस्थितीत तलाठ्यांनी पंचनामा केला.