आगीच्या नुकसानीची पिचड यांनी केली पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:38 IST2021-03-13T04:38:04+5:302021-03-13T04:38:04+5:30
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. यादृष्टीने दुर्दैवी घटनेला तोंड देऊन आवश्यक ती मदत उभी करू, यासाठी मी स्वत: पुढाकार ...

आगीच्या नुकसानीची पिचड यांनी केली पाहणी
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. यादृष्टीने दुर्दैवी घटनेला तोंड देऊन आवश्यक ती मदत उभी करू, यासाठी मी स्वत: पुढाकार घेईन, असेही पिचड यांनी यावेळी सांगितले. विद्यमान कार्यकारिणीचे काम उत्तमप्रकारे सुरू असून संकटकाळातही ते उभे राहतात. शिक्षणासारख्या पवित्र व चांगल्या कामाच्या पाठीशी परमेश्वर आहे. व्यवस्थेत चांगल्या-वाईट चर्चा या होतच असतात, त्याचा विचार न करता चांगले काम सुरू ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली.
यावेळी जनलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन भाऊपाटील नवले, संचालक कैलासराव शेळके, किरण फटांगरे, संस्थेचे उपाध्यक्ष मधुकरराव सोनवणे, सेक्रेटरी यशवंत आभाळे, सहसेक्रेटरी अॅड. भाऊसाहेब गोडसे, खजिनदार एस. पी. देशमुख, कल्पनाताई सुरपुरिया, सदस्य सुधाकरराव देशमुख, अॅड. आनंदराव नवले, अरिफ तांबोळी, एस. पी. मालुंजकर, डॉ. प्रशांत तांबे, पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. आर. डी. पल्हाडे उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर शेळके, उपप्राचार्य डॉ. संजय ताकटे, विभागप्रमुख के. एस. गुंजाळ यांनी झालेल्या नुकसानीची माहिती दिली.