अहमदनगर एमआयडीसीतील पुगलिया कंपनीला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 19:49 IST2017-12-14T19:47:29+5:302017-12-14T19:49:16+5:30
नागापूर एमआयडीसीतील पुगलिया वुलन या कंपनीला गुरुवारी सायंकाळी भीषण आग लागली असून, संपूर्ण कंपनीला आगीने वेढली आहे. आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

अहमदनगर एमआयडीसीतील पुगलिया कंपनीला आग
अहमदनगर : नागापूर एमआयडीसीतील पुगलिया वुलन या कंपनीला गुरुवारी सायंकाळी भीषण आग लागली असून, संपूर्ण कंपनीला आगीने वेढली आहे. आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
नागापूर एमआयडीसीत पुगलिया वुलन ही कंपनी आहे़ या कंपनीत विमानातील सीट तयार होतात. हे सीट तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कंपनीत उच्च दर्जाचे कापड होते. या कापडाने भराभर पेट घेतल्यामुळे काही वेळातच संपूर्ण कंपनी आगीने वेढली गेली. आग लागल्याचे समजताच कर्मचा-यांनी कंपनीच्या बाहेर धाव घेतली. त्यामुळे कोणासही इजा पोहोचली नाही. मात्र, कंपनीतील कापडाने भराभर पेट घेतला. ही आग विझविण्यासाठी महापालिकेचे ३ अग्नीशामक बंब घटनास्थळी दाखल झाले असून, एमआयडीसीचे दोन बंबही आग विझविण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. मात्र, अद्याप आग आटोक्यात आलेली नाही. आग कशामुळे लागली याचे निश्चित कारण अद्याप समोर आलेले नाही.