पोलिसांनी खरा सूत्रधार शोधावा
By Admin | Updated: October 28, 2014 01:01 IST2014-10-28T00:22:20+5:302014-10-28T01:01:07+5:30
पाथर्डी : जवखेडे खालसा येथील तिहेरी हत्याकांडातील खऱ्या सूत्रधाराचा शोध घेऊन जाधव कुटुंबीयांना न्याय द्यावा, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली़

पोलिसांनी खरा सूत्रधार शोधावा
पाथर्डी : जवखेडे खालसा येथील तिहेरी हत्याकांडातील खऱ्या सूत्रधाराचा शोध घेऊन जाधव कुटुंबीयांना न्याय द्यावा, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली़
तालुक्यातील जवखेडे खालसा येथील दलित कुटंबातील तिघांची हत्या झाल्यानंतर जवखेडे खालसा येथे दररोज राज्यभरातील नेते भेट देत आहेत. सोमवारी (दि़ २७) सकाळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट देवून जाधव कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, अत्यंत क्रूरपणे ही हत्या करण्यात आली आहे़ राज्याला न शोभणारी ही घटना आहे. या घटनेतील आरोपींचा तपास लागलाच पाहिजे व यामागे असणारा खरा सूत्रधार पोलिसांनी शोधला पाहिजे़ पोलिसांना तपासाचे काम करण्यासाठी वेळ दिला पाहिजे. महाराष्ट्रात अशा क्रूर घटना घडतात हे दुर्दैव आहे. माझ्या ३०-३५ वर्षाच्या राजकीय इतिहासात एवढी क्रूर व निर्दयी घटना माझ्या पाहण्यात नाही़ मानवतेला काळीमा फासणारी ही घटना आहे, असे सांगत पवार यांनी या घटनेचा निषेध नोंदविला़ जाधव कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर ज्या ठिकाणी ही घटना घडली, त्या ठिकाणी जाऊन पवार यांनी पाहणी केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे, आ़ संग्राम जगताप, केदारेश्वरचे अध्यक्ष प्रताप ढाकणे, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा डॉ. मेधा कांबळे, बाळासाहेब ताठे आदी उपस्थित होते़ (तालुका प्रतिनिधी)