शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

'हिरण यांच्या मारेकऱ्यांना शोधून अल्पसंख्याक समाजाला न्याय द्या'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 02:31 IST

विजय दर्डा यांची गृहमंत्र्यांकडे मागणी : जैन महासंघाचे राज्यव्यापी आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : नगर जिल्ह्यातील प्रथितयश व्यापारी गौतम हिरण यांचे अपहरण झाले व नंतर त्यांची हत्या झाली. ही घटना अत्यंत निषेधार्ह असून, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याप्रकरणी कठोर पावले उचलून अल्पसंख्य समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी माजी खासदार व सकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय दर्डा यांनी केली आहे.१ मार्च रोजी हिरण (रा. बेलापूर, ता. श्रीरामपूर) यांचे अपहरण झाले. मात्र, पोलीस त्यांची सुटका करू शकले नाहीत. त्यानंतर ७ तारखेला सकाळी त्यांचा मृतदेह सापडला. या घटनेचा राज्यातून निषेध होत आहे. याबाबत आपल्या भावना व्यक्त करताना विजय दर्डा म्हणाले, ही घटना वेदनादायी आहे. पोलीस दलाने घटनेच्या मुळापर्यंत जाऊन सूत्रधारांचा शोध घेणे आवश्यक आहे.

दरम्यान, अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघानेही या घटनेचा निषेध केला असून, बुधवारी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी व राष्ट्रीय महामंत्री संदीप भंडारी यांनी यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, हिरण यांचे अपहरण झाल्यापासून जैन अल्पसंख्याक महासंघ राज्य सरकारकडे पाठपुरावा करत होता व तपासासाठी आग्रही होता. दुर्दैवाने तपास न होता हिरण यांचा मृतदेहच मिळाला. हे पोलिसांचे अपयश व निष्क्रियता असल्याची व्यापारी समाजाची भावना आहे. आरोपी व सूत्रधारांना अटक होण्याच्या मागणीसाठी १० मार्च रोजी संपूर्ण राज्यात व्यापारी वर्ग व जैन समाजातर्फे निदर्शने केली जाणार आहेत. तसेच व्यापारी काळ्या फिती लावून कामकाज करणार आहेत. एक आठवड्यात खुन्यांवर कारवाई न झाल्यास संपूर्ण देशात आंदोलन उभारण्याचा इशाराही महासंघाने दिला आहे.

हत्येप्रकरणी दोघांना अटकबेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या अपहरण आणि हत्याप्रकरणात सोमवारी पोलिसांनी शहरातील दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली. आरोपींविरुद्ध सबळ पुरावे असून, त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखCrime Newsगुन्हेगारी