रस्त्यावरून झालेल्या वादातून गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:27 IST2021-09-10T04:27:55+5:302021-09-10T04:27:55+5:30

संगमनेर : संगमनेर पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ अरगडे यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात अदखल पात्र गुन्ह्याची नोंद आहे. संगमनेर तालुका ...

Filed a crime from a street dispute | रस्त्यावरून झालेल्या वादातून गुन्हे दाखल

रस्त्यावरून झालेल्या वादातून गुन्हे दाखल

संगमनेर : संगमनेर पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ अरगडे यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात अदखल पात्र गुन्ह्याची नोंद आहे. संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे संचालक विलास कवडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच संचालक कवडे यांच्याविरोधात देखील अदखल पात्र गुन्ह्याची नोंद आहे. रस्त्यावरून झालेल्या वादातून हे गुन्हे दाखल करण्यात आले.

दूध संघाचे संचालक विलास कवडे (वय ४७, रा. गणेशनगर, संगमनेर) यांनी उपसभापती नवनाथ अरगडे (रा. अरगडे मळा, गुंजाळवाडी, ता. संगमनेर) यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे. सोमवारी (दि. ६) सकाळी साडेदहाच्या सुमारास गणेशनगर येथे अरगडे यांनी त्यांच्या कॅबिनमध्ये मला बोलावून घेतले. ‘तू विकत घेतलेल्या जागेत आम्हाला रस्ता करायचा आहे.’ असे ते म्हणाले. अरगडे यांना समजून सांगत असताना त्यांनी धक्काबुक्की करत तुला संपून टाकतो, असा दम दिल्याचे कवडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

याेगेश गुंजाळ (रा. गुंजाळवाडी, ता. संगमनेर) यांनी दूध संघाचे संचालक कवडे यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. सोमवारी (दि. ६) सकाळी दहाच्या सुमारास सामाईक रस्त्याचे काम करण्याकरिता कवडे यांना विचारणा करण्यासाठी गेलो होतो. तुम्ही इथे यायचे नाही, असे म्हणत कवडे यांनी धक्काबुक्की, शिवीगाळ केल्याचे गुंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंदराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉस्टेबल गोरे, पोलीस हेड कॉस्टेबल टोपले हे अधिक तपास करीत आहे.

Web Title: Filed a crime from a street dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.