मयत महिला डॉक्टरच्या पतीविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:47 IST2021-09-02T04:47:09+5:302021-09-02T04:47:09+5:30
पूनम याेगेश निघुते (वय ३५, रा. चिरायू हॉस्पिटल, ताजणे मळा, नवीन नगर रस्ता, संगमनेर) असे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे ...

मयत महिला डॉक्टरच्या पतीविरोधात गुन्हा दाखल
पूनम याेगेश निघुते (वय ३५, रा. चिरायू हॉस्पिटल, ताजणे मळा, नवीन नगर रस्ता, संगमनेर) असे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. डॉ. योगेश यशवंत निघुते (रा. चिरायू हॉस्पिटल, ताजणे मळा, नवीन नगर रस्ता, संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शरद कमलाकर कोलते (रा. प्लॉट क्रमांक २५, कामाक्षी निवास, घायाळनगर, जुना जालना, जि. जालना) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. पूनम निघुते यांनी बेडरूममध्ये छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची नोंद दत्तात्रय गुलाबराव जोंधळे (रा. गुंजाळवाडी, संगमनेर) यांनी दिलेल्या खबरीवरून पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. आई-वडिलांकडून वारंवार पैशांच्या मागणीचा तगादा लावून चारित्र्यावर संशय घेऊन डॉ. पूनम निघुते यांना त्यांचा पती डॉ. योगेश निघुते हा मारहाण करत होता. तसेच त्यांना आठ वर्षांचा मुलगा असतानादेखील आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंदराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे हे अधिक तपास करीत आहेत.