वाळू तस्कराच्या विरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2016 01:17 IST2016-06-30T01:09:53+5:302016-06-30T01:17:47+5:30
श्रीगोंदा : हंगेवाडी शिवारात वाळू खोदकाम करताना सोमनाथ साहेबराव सुपेकर या मजुराचा अंगावर डगर कोसळून मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर तब्बल महिन्यानंतर वाळू

वाळू तस्कराच्या विरोधात गुन्हा दाखल
श्रीगोंदा : हंगेवाडी शिवारात वाळू खोदकाम करताना सोमनाथ साहेबराव सुपेकर या मजुराचा अंगावर डगर कोसळून मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर तब्बल महिन्यानंतर वाळू तस्कर नितीन आप्पा भिसे (रा. हंगेवाडी) याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
२९ मे रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सोमनाथ साहेबराव सुपेकर याच्या अंगावर वाळूची डगर कोसळून त्याचा मृत्यू झाला. मात्र संबंधित वाळू तस्करांनी मयताचे नातेवाईक व पोलिसांना हाताशी धरून सोमनाथ सुपेकर शौचालयास बसला असताना मातीची डगर अंगावर कोसळ्याने मृत्यू झाला, असा खोटा पंचनामा करून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला होता.
जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांनी फेरतपासाचे आदेश दिल्यानंतर या प्रकरणाने यूटर्न घेतला. हे प्रकरण बेलवंडी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात घडले असताना श्रीगोंदा पोलिसांनी या प्रकरणाचा पंचनामा करून गुन्हा नोंदविण्याची घाई का केली, यावर ताशेरे ओढले.
पोलीस निरीक्षक साहेबराव कडनोर यांनी या प्रकरणात लक्ष घालून मुख्य गुन्हेगार कोण, याचा छडा लावण्यासाठी मयताचे नातेवाईक व घटनेचा स्पॉट पंचनामा करणाऱ्या पोलिसांचे फेर जबाब नोंदविले व सोमनाथ सुपेकर याचा मृत्यू शौचास बसला असताना नव्हे तर वाळू उपसा करताना झाला याची माहिती खातरजमा करून संबंधित वाळू तस्करांच्या विरोधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. श्रीगोंदा पोलिसांनी हा गुन्हा तपासासाठी बेलवंडी पोलिसांकडे वर्ग केला आहे.
(तालुका प्रतिनिधी)