वाहन चालकांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:21 IST2021-05-14T04:21:13+5:302021-05-14T04:21:13+5:30

गुरुवारी सायंकाळी पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी पोलीस ठाण्यास भेट देऊन माहिती घेतली. चार ट्रक एकूण ४३० क्विंटल रेशनिंग ...

File a case against the driver | वाहन चालकांवर गुन्हा दाखल

वाहन चालकांवर गुन्हा दाखल

गुरुवारी सायंकाळी पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी पोलीस ठाण्यास भेट देऊन माहिती घेतली. चार ट्रक एकूण ४३० क्विंटल रेशनिंग दुकानांचा माल घेऊन चालल्या होत्या. पार्श्वभूमीवर राजूर पोलीस ठाण्यासमोर पोलीस उपनिरीक्षक नितीन खैरनार, हवालदार विजय फटांगरे, अशोक गाडे, डी के भडकवाड नाकाबंदी करत असताना हे चारही ट्रकमध्ये असलेल्या रेशनिंगच्या मालाच्या पावत्यांवर चालकाचे नाव,गाडी क्रमांक,गोदामपालाची सही, दिनांक आढळून आला नाहीत. वाहने संशयास्पद असल्याचा अंदाज घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे,पोलीस उपनिरीक्षक नितीन खैरनार यांनी ही वाहने समोरील जागेत लावून दिली होती.

पोलीस हवालदार विजय फटांगरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक हौशीराम दिनकर देशमुख, साई संदेश धुमाळ, योगेश राजेंद्र धुमाळ, अशोक हिरामण देशमुख या चौघांवर राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतले असून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.

ताब्यात घेण्यात आलेला गहू, तांदूळ आणि वाहनांसह एकूण ५६ लाख १३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेत जप्त करण्यात आला. पुढील तपास सपोनि साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खैरनार करत आहेत.

पोलीस उपअधीक्षक मदने यांनी येथे भेट दिली. शासकीय गोदामातून माल कसा आला याबरोबरच वापरण्यात आलेली वाहने व इतर माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: File a case against the driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.