बांधावरून दोन गटांत हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:23 IST2021-01-16T04:23:19+5:302021-01-16T04:23:19+5:30

१४ जानेवारी रोजी सकाळी १० च्या सुमारास राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्द येथील शेतामध्ये येथील फिर्यादी महेश ज्ञानदेव कोल्हापुरे आणि ...

Fighting in two groups from the dam | बांधावरून दोन गटांत हाणामारी

बांधावरून दोन गटांत हाणामारी

१४ जानेवारी रोजी सकाळी १० च्या सुमारास राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्द येथील शेतामध्ये येथील फिर्यादी महेश ज्ञानदेव कोल्हापुरे आणि जखमी विजय हरिश्चंद्र हे शेतामध्ये ट्रॅक्‍टरच्या साह्याने पेरणी करत होते. पेरणी झाल्यानंतर आरोपी पंढरीनाथ हरिचंद्र हा जखमी विजय हरिश्चंद्र यांच्या शेतामध्ये अनधिकृतपणे घुसला. आमच्या सामाईक बांधावर दगड ठेवले होते, ते कोणी नेले. यावेळी पंढरीनाथ हरिश्चंद्र याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. घटनेबाबत महेश कलापुरे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस स्टेशनमध्ये पंढरीनाथ हरिचंद्र याच्या विरोधात जबर मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आव्हाड करत आहेत. घटनेनंतर आरोपी पंढरीनाथ हरिचंद्र पसार झाला आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Web Title: Fighting in two groups from the dam