दोन गटात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:21 IST2021-05-21T04:21:55+5:302021-05-21T04:21:55+5:30

दत्तात्रय मच्छिंद्र बर्डे यांनी आश्वी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, मंगळवार दिनांक १८ मे रोजी घरासमोरील रस्त्यावर मुलांनी ...

Fighting in two groups | दोन गटात हाणामारी

दोन गटात हाणामारी

दत्तात्रय मच्छिंद्र बर्डे यांनी आश्वी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, मंगळवार दिनांक १८ मे रोजी घरासमोरील रस्त्यावर मुलांनी पाणी का फेकले हे विचारले. विजय बाळाजी पवार, शिवप्रसाद रमेश पवार, कृष्णा रमेश पवार, रमेश बाळाजी पवार यांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची तक्रार दाखल केली आहे. तर विजय बाळाजी पवार यांनी आश्वी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, रस्त्याने जात असताना दत्तात्रय मच्छिंद्र बर्डे, सदाशिव मच्छिंद्र बर्डे, छाया सदाशिव बर्डे, संगीता दत्तात्रय बर्डे रस्त्याचा कडेला उभे राहून शिवीगाळ करत होते. त्यांना शिवीगाळ करु नका असे म्हटल्याचा राग आल्याने मारहाण केली. दोन्ही बाजूच्या तक्रारीवरुन आश्वी पोलीस स्टेशनला आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Fighting in two groups