व्यक्ती विरोधात नाही तर अपप्रवृत्ती विरोधी लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:26 IST2021-02-25T04:26:04+5:302021-02-25T04:26:04+5:30
तालुक्यातील माजी मंत्री मधुकर पिचड विरोधकांनी आता अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी बचावचा नारा दिला आहे. दोन निमंत्रित विश्वस्त यांचेसह ...

व्यक्ती विरोधात नाही तर अपप्रवृत्ती विरोधी लढा
तालुक्यातील माजी मंत्री मधुकर पिचड विरोधकांनी आता अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी बचावचा नारा दिला आहे. दोन निमंत्रित विश्वस्त यांचेसह विद्यमान आमदार व प्रमुख नेत्यांची अकोले एज्युकेशन सोसायटी बचाव कृती समितीची सहविचार सभा मंगळवारी राष्ट्रवादीच्या कार्यालयात पार पडली. यावेळी आमदार लहामटे यावेळी बोलत होते.
अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीची सर्वसाधारण सभा बोलावण्यात यावी. २००८ पासून सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराची चौकशी व्हावी असा एकमताने ठराव या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शेतकरी नेते साथी दशरथ सावंत होते.
संस्थेचे कार्याध्यक्ष मधुकर पिचड यांच्या नावाखाली विद्यमान अध्यक्ष व सचिव यांनी कोट्यावधीचा गैरव्यवहार करत मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप सर्वच वक्त्यांनी केला. प्रथम सर्वसाधारण सभा, नंतर धर्मदाय आयुक्त, न्यायालय व शेवटी जनतेचा दबाव अशा पद्धतीने दाद मागण्याची रणनीती ठरविण्यात आली.
मुलींच्या वसतिगृहात एक कोटी रुपये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सेवानिवृत्त प्राचार्य रमेशचंद्र खांडगे यांनी केला. बेकायदेशीर व अनावश्यक बांधकाम, नोकरभरती, प्रॉव्हिडंट फंड गैरव्यवहार याकडे लक्ष वेधण्यात आले. आमदार डॉ. लहामटे, दशरथ सावंत, प्रा.डॉ.दशरथ बंगाळ, माजी प्राचार्य रमेशचंद्र खांडगे, सुरेश गडाख, दादापाटील वाकचौरे, मिनानाथ पांडे, वकील किसन हांडे, शांताराम गजे, भानुदास तिकांडे, कोंडाजी ढोन्नर, नितीन जोशी, सोन्याबापू वाकचौरे, डॉ. दामोधर सहाणे, विनोद रासणे, अरुण रुपवते, राजेंद्र कुमकर, रवी मालुंजकर, मनोज गायकवाड, सुरेश खांडगे, संपत नाईकवाडी, दशरथ रोकडे, माधव आवारी, सुरेश शिंदे, प्रशांत धुमाळ आदी उपस्थित होते.