शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पन्नास वर्षे आम्ही केवळ ‘शब्द’ देत आलो, सुजय यांनी उलगडले विखे घराण्याच्या राजकारणाचे रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 23:42 IST

नगर शहरात उद्धव ठाकरे यांच्या सभेत ते बोलत होते.

अहमदनगर: आमदारकीसाठी इच्छुक असणा-या सगळ्यांना शब्द द्या, पण कुणाला शब्द दिला ते दुस-याला सांगू नका. गत पन्नास वर्षे आम्ही हेच केले, असे विधान करत भाजपाचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी विखे घराण्याच्या राजकारणाचे रहस्यच बुधवारी नगर येथे उलगडले. विखे यांच्या या विधानाने व्यासपीठावरील उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.

नगर शहरात उद्धव ठाकरे यांच्या सभेत ते बोलत होते. नगर मतदारसंघातून शिवसेनेकडून यावेळी अनेकजण इच्छुक होते. मात्र अनिल राठोड यांना उमेदवारी मिळाली. तो धागा पकडत विखे राठोड यांना उद्देशून म्हणाले, ‘तुमचे आता वय झाले आहे. पण एवढी घ्या मारुन अन् रिटायर व्हा. म्हणजे बाकी लोकांचे नंबर लागतील. आमदार व्हायचे असेल तर जे इच्छुक आहेत. त्या प्रत्येकाला पुढच्या आमदारकीचा शब्द द्या. फक्त कुणाला शब्द दिला हे इतरांना कळू देऊ नका. पन्नास वर्षे आम्ही हेच राजकारण करत आलो आहोत. तुम्ही आमच्या सानिध्यात या’ असे ते म्हणाले. 

खासदार विखे वादग्रस्त विधानांमुळे सध्या जिल्ह्यात चर्चेत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्हाला चालत नसतील तर तुमच्या खात्यावर जमा केलेले दोन हजार रुपये परत करा, ते गरिबांना वाटू हे त्यांचे विधान सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना ताजी असतानाच विखे यांनी पुन्हा नगर येथे विखे कुटुंबाच्या ५० वर्षांतील राजकारणाचे रहस्य उलडले.

उद्धव यांनी टाळला लाल दिव्याचा उल्लेखआपणाला लाल दिवा मिळणार, असा उल्लेख अनिल राठोड यांनी त्यांच्या भाषणात केला. इतर नेत्यांनीही या मुद्याला स्पर्श केला. मात्र, उद्धव यांनी आपल्या भाषणात या मुद्याचा उल्लेख केला नाही. राष्ट्रवादीचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला. 

टॅग्स :Sujay Vikheसुजय विखेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019