घरफोडी करून पन्नास हजारांचे दागिने चोरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:20 IST2021-05-10T04:20:38+5:302021-05-10T04:20:38+5:30

......... घरफोडी करून सायकल गॅस टाकी चोरली अहमदनगर : शहरातील फुलसौंदर मळा येथील विनायकनगर येथे चोरट्यांनी घरफोडी करून सायकल ...

Fifty thousand jewels were stolen by burglars | घरफोडी करून पन्नास हजारांचे दागिने चोरले

घरफोडी करून पन्नास हजारांचे दागिने चोरले

.........

घरफोडी करून सायकल गॅस टाकी चोरली

अहमदनगर : शहरातील फुलसौंदर मळा येथील विनायकनगर येथे चोरट्यांनी घरफोडी करून सायकल व एक गॅस टाकी चोरून नेली. सात ते आठ मे दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात सौरभ कृष्णा बागडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हेड कॉन्स्टेबल ढगे पुढील तपास करत आहेत.

........

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या विरोधात कारवाई

अहमदनगर : कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी येथील लोहकरा ओढ्यातून अवैध वाळू वाहतूक करताना पोलिसांनी एकास ताब्यात घेत १ ब्रास वाळू व एक ट्रॅक्टर जप्त केला आहे. आठ मे रोजी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार विकास चंदन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संजय नामदेव कोरडकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हवालदार माळशिखरे हे पुढील तपास करत आहेत.

........

Web Title: Fifty thousand jewels were stolen by burglars