शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
2
बीएलओंची समस्या आता दूर होणार; SIR प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
3
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
4
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
5
अभिमानास्पद! PM मोदींनी पुतिन यांना दिली अत्यंत खास भेट; जगात लाखो लोकांना आजही प्रेरणादायी
6
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
7
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
8
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
9
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
10
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
11
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
12
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
13
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
14
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
15
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
16
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
17
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
18
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
19
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
20
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
Daily Top 2Weekly Top 5

टाकळी ढोकेश्वरमध्ये अडकलेले पंधरा विद्यार्थी उन्नावकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 16:55 IST

टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथील जवाहर नवोदय विद्यालयातील १५ विद्यार्थी रविवारी सकाळी उत्तर प्रदेशातील उन्नावकडे रवाना झाले. त्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाने एक एसटी बस उपलब्ध करून दिली आहे.

टाकळी ढोकेश्वर : टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथील जवाहर नवोदय विद्यालयातील १५ विद्यार्थी रविवारी सकाळी उत्तर प्रदेशातील उन्नावकडे रवाना झाले. त्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाने एक एसटी बस उपलब्ध करून दिली आहे.टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयात उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील १५ विद्यार्थी इयत्ता नववीतील शिक्षणासाठी आले आहेत. वर्षाच्या अंतर्गत आदान प्रदान अभ्यासक्रमासाठी ते आले होते. तर टाकळी ढोकेश्वरच्या नवोदय विद्यालयातील १५ विद्यार्थीही उन्नाव येथील नवोदय विद्यालयात इयत्ता नववीतील वर्षाच्या अंतर्गत आदानप्रदान अभ्यासक्रमासाठी गेले होते. एप्रिल अखेर दोन्हीकडचेही विद्यार्थी पुन्हा त्यांच्या शिक्षणाच्या ठिकाणी परतणार होते. मात्र मार्च अखेरीस देशभर लॉकडाऊन सुरू झाले. त्यानंतर टाकळीचे विद्यार्थी उन्नावला तर उन्नावचे विद्यार्थी टाकळीत अडकले. याबाबतची माहिती विद्यार्थ्यांच्या पालकांनी आमदार निलेश लंके यांना दिली. त्यांनी तातडीने टाकळी ढोकेश्वर येथील नवोदय विद्यालयास भेट दिली. विद्यालयाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी संवाद साधला. त्यांनी उत्तर प्रदेशच्या उन्नाव येथील जिल्हा प्रशासनाशी संपर्क करून या विद्यार्थ्यांना उत्तर प्रदेशातील उन्नावला जाण्याची परवानगी दिली. टाकळी येथील उन्नावला असणारे विद्यार्थी परत टाकळली सोडण्यासाठी परवानगी घेतली. टाकळी ढोकेश्वर येथील नवोदय विद्यालयातील १५ विदयार्थ्यांना रविवार सकाळी ८:३० वाजता एसटी बसमध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवून उन्नावकडे रवाना करण्यात आले. यावेळी तहसीलदार ज्योती देवरे यांनी सर्व विद्यार्थ्यांनाना कोरोना संदर्भात मार्गदर्शन केले. या प्रसंगी प्राचार्य एस. बी. बोरसे, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेरSchoolशाळाStudentविद्यार्थी