कोपरगावात शनिवारी १५ बाधित रुग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:39 IST2021-02-21T04:39:26+5:302021-02-21T04:39:26+5:30

कोपरगाव : कोपरगावात नगर येथील अहवालात ५, खासगी लॅब १० असे एकूण १५ रुग्ण शनिवारी ( दि. २० ...

Fifteen infected patients were found in Kopargaon on Saturday | कोपरगावात शनिवारी १५ बाधित रुग्ण आढळले

कोपरगावात शनिवारी १५ बाधित रुग्ण आढळले

कोपरगाव : कोपरगावात नगर येथील अहवालात ५, खासगी लॅब १० असे एकूण १५ रुग्ण शनिवारी ( दि. २० फेब्रुवारी ) कोरोणा बाधित आढळले आहे. तसेच ३४ व्यक्तींच्या घशातील स्त्राव नगर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यामुळे तालुक्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या १८ इतकी झाली आहे, अशी माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

शनिवारी बाधित आलेल्या रुग्णामध्ये शहरातील राममंदिर ५, निवारा १, भगवती कॉलनी १, टिळकनगर १, श्रद्धानगरी १, साईसिटी १, समतानगर १, कोपरगाव १, तर तालुक्यातील वारी १, पोहेगाव १, बक्तरपूर १ येथील रुग्णांचा समावेश आहे. शहरासह तालुक्यात पुन्हा रुग्ण वाढ होत असल्याने नागरिकांनी कोरोना संदर्भातील सर्व नियमाचे पालन करावे, असे आवाहन डॉ. फुलसौंदर यांनी केले आहे.

Web Title: Fifteen infected patients were found in Kopargaon on Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.