सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

By Admin | Updated: May 27, 2016 23:23 IST2016-05-27T23:01:02+5:302016-05-27T23:23:31+5:30

अहमदनगर : अहमदनगर शहराच्या ५२६ व्या स्थापनादिनानिमित्त शहरात शनिवारी विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे़

The Festival of Social, Cultural Events | सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

अहमदनगर : अहमदनगर शहराच्या ५२६ व्या स्थापनादिनानिमित्त शहरात शनिवारी विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे़
सावेडी येथील पटवर्धन सभागृहात प्रेस क्लब व चित्रकार योगेश हराळे यांच्या संयुक्त विद्यमाने हराळे यांच्या ऐतिहासिक वास्तुंचे चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे़ या प्रदर्शनात शहरातील ५०० वर्षातील ऐतिहासिक भुईकोट किल्ला, चाँदबिबी महाल, शुक्लेश्वर मंदिर, नृसिंह मंदिर, अवतार मेहेरबाबा समाधी, दमडी मशीद, ह्यूम मेमोरियल चर्च, आनंदऋषीजी महाराज समाधी, भाऊसाहेब फिरोदिया विद्यालय, चौथे शिवाजी महाराज यांची समाधी, रणगाडा संग्रहालय आदी ठिकाणांची माहिती दर्शविणारे चित्रप्रदर्शन होणार आहे़ सकाळी ११ वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्याहस्ते होणार आहे़
रसिक ग्रुपच्यावतीने सावेडी येथील हस्त-बेहश्तबाग येथे गायक पवन नाईक यांच्या मराठी, हिंदी आणि उर्दू गीतांच्या मैफलीचे आयोजन करण्यात येणार आहे़ सायंकाळी ७ वाजता ही मैफल रंगणार आहे़ तसेच रसिक ग्रुपच्यावतीने दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या निवासस्थानी सकाळी १० वाजता निलफलकाचे अनावरण करण्यात येणार आहे़ मातोश्री रहेमत सुलतान स्मरणार्थ शहरातील सामाजिक कार्य करणाऱ्या विविध जाती-धर्मातील महिला कार्यकर्त्यांना ‘अहमदनगर कन्या’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे़ शहरातील सर्जेपुरा येथील रहेमत सुलतान सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे़ यावेळी अलका मोरे, रजनी जाधव, अंजली केवळ, राणी पवार, वैशाली गांधी, शेख रुबीना, तबस्सुम सय्यद, मेघना टेपाळे यांना पुरस्कार देण्यात येणार आहे़

Web Title: The Festival of Social, Cultural Events

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.