महिला डॉक्टरांचा मोबाईल लांबविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:15 IST2021-06-03T04:15:44+5:302021-06-03T04:15:44+5:30

सूर्यानगर या ठिकाणी राहणाऱ्या डॉ. शीतल सुधाकर हिवरकर (वय ४२) या रात्रीचे जेवण झाल्यानंतर त्यांच्या घरासमोर फिरत असताना ...

The female doctor's mobile was lengthened | महिला डॉक्टरांचा मोबाईल लांबविला

महिला डॉक्टरांचा मोबाईल लांबविला

सूर्यानगर या ठिकाणी राहणाऱ्या डॉ. शीतल सुधाकर हिवरकर (वय ४२) या रात्रीचे जेवण झाल्यानंतर त्यांच्या घरासमोर फिरत असताना काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून दोन आरोपी आले. त्यातील मागे बसलेल्या आरोपीने हिवरकर यांच्या हातातील २० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन हिसकावून घेतला.

या दरम्यान झालेल्या गडबडीत तो मोबाईल खाली जमिनीवर पडला. हिवरकर यांनी तत्काळ तो उचलून घेतला. मोटारसायकलवर मागे बसलेल्या आरोपीने खाली उतरून डॉक्टरांच्या हातातील मोबाईल हिसकावून त्यांना जोराचा धक्का देत रस्त्यावर पाडले. घटनेनंतर हे दोन्ही चोरटे क्षणात पसार झाले.

शहर पोलीस ठाण्यात हिवरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके तसेच पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी घटनास्थळी भेट दिली.

----

काळ्या रंगाच्या मोटरसायकलवर पसार होणाऱ्या या दोन्ही आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहेत. उपनिरीक्षक समाधान सुरवडे यांच्याकडे तपास सोपविण्यात आला आहे.

Web Title: The female doctor's mobile was lengthened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.