जमिनीच्या वादातून पिता-पुत्राचा खून
By Admin | Updated: June 27, 2023 11:43 IST2014-05-13T00:44:36+5:302023-06-27T11:43:33+5:30
जामखेड : जमिनीचा वादातून पिता-पुत्रास कोयता, तलवार, कुºहाडीने डोक्यावर व पायावर मारहाण करण्याची घटना तालुक्यातील काटेवाडी येथे घडली़

जमिनीच्या वादातून पिता-पुत्राचा खून
जामखेड : जमिनीचा वादातून पिता-पुत्रास कोयता, तलवार, कुºहाडीने डोक्यावर व पायावर मारहाण करण्याची घटना तालुक्यातील काटेवाडी येथे घडली़ या मारहाणीत पिता-पुत्राचा मृत्यू झाला असून, पोलिसांनी ३२ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे़ पोलिसांनी याप्रकरणी चार जणांना अटक केली आहे. आसाराम यशवंत बहिर (वय ६५) व नितीन आसाराम बहिर (वय २५) असे मृत पिता-पुत्राचे नाव आहे़ याबाबत जामखेड पोलिसात मयत आसाराम यांचा मोठा मुलगा बापूसाहेब आसाराम बहिर (वय २९, रा.काटेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे़ पोलिसांच्या माहितीनुसार काटेवाडी येथे असलेल्या शेतजमिनीचा न्यायालयीन निकाल आसाराम बहिर यांच्या बाजूने लागला होता़ मात्र, या जमिनीवर महादेव गहिनीनाथ बहिर व त्यांचे नातेवाईक हक्क सांगत होते़ त्यामुळे महादेव बहिर व त्यांच्या नातेवाईकांनी आसाराम बहिर यांना वेळोवेळी धमकी देऊन मारहाणही केली होती़ सोमवारी पहाटे सहाच्या सुमारास महादेव गहिनीनाथ बहिर, सचिन महादेव बहिर, रघुनाथ साहेबराव बहिर, शहाजी रघुनाथ बहिर, कैलास तात्याबा बहिर यांनी बापूसाहेब यांच्या घराचा दरवाजा तोडून घरात आले़ शिवीगाळ, दमदाटी करुन आम्ही तुम्हाला शेती करुन देणार नाही. रानात आल्यास मारुन टाकू असा दम दिला़ त्यानंतर फिर्यादी बापूसाहेबचे वडील आसाराम यशवंत बहिर (वय ६५) यांच्या डोक्याला पिस्तुल लावून घराबाहेर आणले़ घराबाहेर आणल्यानंतर आसाराम यांच्या डोक्यावर व पायावर त्यांनी कोयता, तलवार, कुºहाडीने जबर मारहाण केली़ आसाराम यांचा बचाव करण्यासाठी गयाबाई (फिर्यादीची आई) यांनी धाव घेतली़ त्यावेळी गयाबाई यांनाही मारहाण करण्यात आली़ त्यात गयाबाई यांचा हात फ्रॅक्चर झाला़ तर शौचास गेलेला नितीन आसाराम बहिर (वय २५, फिर्यादीचा भाऊ) यालाही कोयता, गज, तलवारीने जबर मारहाण केली़ त्याचवेळी पोलिसांची गाडी आल्याने आरोपींनी तेथून पळ काढला़ फिर्यादी बापूसाहेब हा लपून बसल्यामुळे तो वाचला. पोलिसांनी जखमी आसाराम व नितीन यांना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले़ प्राथमिक उपचारानंतर जखमींना नगर यथील सिव्हील हॉस्पिटलला हलवण्यात आले. परंतु वाटेतच या दोघांचा मृत्यू झाला. दरम्यान काटेवाडी येथे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. तसेच फरारी आरोपी शोधण्यासाठी पोलिसांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. (तालुका प्रतिनिधी) ग्रामीण रुग्णालयात मयताचे शवविच्छेदन केल्यानंतर आरोपींना अटक करावी, अशी मागणी करुन नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. पोलीस उपअधीक्षक धिरज पाटील यांनी आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले़ हे आहेत आरोपी... महादेव गहिनीनाथ बहिर, सचिन महादेव बहिर, रघुनाथ साहेबराव बहिर, शहाजी रघुनाथ बहिर, कैलास तात्याबा बहिर, राजेंद्र महादेव बहिर, सुखदेव रघुनाथ बहिर, मल्हारी कैलास बहिर, भाऊसाहेब आजिनाथ बहिर, दत्तात्रय आजीनाथ बहिर, आजिनाथ बाळा बहिर, ईश्वर मारुती बहिर, दादा किसन बहिर, आण्णा किसन बहिर, विष्णू सीताराम जगदाळे, दादा विष्णू जगदाळे, शंकर रावसाहेब बहिर, उद्धव साहेबराव बहिर, सोमनाथ उद्धव बहिर, अरुण उद्धव बहिर, अशोक बाळू बहिर, संदीप गणपत बहिर, कमलबाई रघुनाथ बहिर, कुसूम कैलास बहिर, तारामती किसन बहिर, मालन विष्णू जगदाळे, उषा दत्तात्रय बहिर, उर्मिला भाऊसाहेब बहिर, सोडार महादेव बहिर, शारदा बाळू बहिर, कल्याण बहिरचा लहान भाऊ, विष्णू जगदाळे यांची मुलगी आदिका हिचा नवरा व इतर ७ ते ८ अनोळखी इसमांवर जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ मयत नितीन हा इगतपुरी येथे कृषी खात्यात कृषी सहाय्यक म्हणून नोकरीस होता. त्याचे लग्न १९ मे रोजी होणार होते. त्यासाठी तो गावी आला होता. लग्नपत्रिका वाटून झाल्या होत्या. परंतु सोमवारी सकाळीच भाऊबंदकीच्या वादाने त्याचा बळी घेतला़