फत्तेचंद रांका यांची ए.एच.पोखरणा ज्वेलर्सला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:21 IST2021-09-03T04:21:58+5:302021-09-03T04:21:58+5:30

अहमदनगर : महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी सर्जेपुरा येथे ए. एच. पोखरणा ज्वेलर्सच्या नूतन प्रशस्त ...

Fatehchand Ranka visits AH Pokhrana Jewelers | फत्तेचंद रांका यांची ए.एच.पोखरणा ज्वेलर्सला भेट

फत्तेचंद रांका यांची ए.एच.पोखरणा ज्वेलर्सला भेट

अहमदनगर : महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी सर्जेपुरा येथे ए. एच. पोखरणा ज्वेलर्सच्या नूतन प्रशस्त दालनास गुरुवारी सदिच्छा भेट दिली. यावेळी पुण्यातील सराफ व्यावसायिक राजाभाऊ वाईकर उपस्थित होते. दोघांचाही पोखरणा ज्वेलर्सच्यावतीने अनिल पोखरणा यांनी सत्कार केला. यावेळी भारती अनिल पोखरणा, अमित पोखरणा, पूजा पोखरणा, आकाश पोखरणा, पार्श्व पोखरणा, अमित कोठारी आदी उपस्थित होते.

यावेळी रांका म्हणाले, सराफ सुवर्णकार व्यवसाय हा भारतातील पुरातन व्यवसाय असून या व्यवसायात सचोटी, विश्वासार्हता व आपुलकीची सेवा महत्त्वाची असते. नगरमध्ये सुवर्ण व्यवसाय चांगला वाढत आहे. ए. एच. पोखरणा ज्वेलर्सने खास ग्राहकांच्या सोयीसाठी नवीन प्रशस्त सुवर्णदालन उभारून ग्राहकांप्रति असलेली निष्ठा व्यक्त केली आहे. या परिवाराशी आपले कौटुंबिक ऋणानुबंध आहेत. ते ग्राहकांना कायम सर्वोत्तम सुवर्णसेवा देत सराफ व्यवसायाची प्रतिष्ठा आणखी वाढवतील.

अनिल पोखरणा म्हणाले, रांका परिवाराशी आमचे पूर्वीपासून कौटुंबिक संबंध आहेत. सुवर्ण व्यवसायात उतरताना अमित यांनी पुण्यात प्रतिष्ठित रांका ज्वेलर्समध्येच काही काळ अनुभव घेतला. फत्तेचंदजी आमच्यासाठी कायम मार्गदर्शक आहेत. (वा. प्र.)

----------

फोटो- ०२ पोखरणा

महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी सर्जेपुरा येथे ए. एच. पोखरणा ज्वेलर्सच्या दालनास गुरुवारी सदिच्छा भेट दिली. समवेत राजाभाऊ वाईकर, भारती व अनिल पोखरणा, अमित पोखरणा, पूजा पोखरणा, आकाश पोखरणा, पार्श्व पोखरणा, अमित कोठारी आदी उपस्थित होते.

Web Title: Fatehchand Ranka visits AH Pokhrana Jewelers