येळपणे गावडेवस्ती रस्त्याचे भाग्य उजळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:46 IST2021-09-02T04:46:41+5:302021-09-02T04:46:41+5:30
श्रीगोंदा : माजी आमदार राहुल जगताप यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री सडक योजनेतून मंजूर झालेल्या येळपणे येथील येळपणे ते गावडेवाडी या ...

येळपणे गावडेवस्ती रस्त्याचे भाग्य उजळणार
श्रीगोंदा : माजी आमदार राहुल जगताप यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री सडक योजनेतून मंजूर झालेल्या येळपणे येथील येळपणे ते गावडेवाडी या रस्त्याच्या कामासाठी १ कोटी ४ लाखांचा निधी मंजूर झाला असून या निधीतून पावणेदोन किमी लांबीचा रस्ता डांबरीकरण होणार आहे.
या कामाचे भूमिपूजन राहुल जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. राहुल जगताप म्हणाले, तालुक्यातील रस्त्यांचा प्रश्न अत्यंत बिकट होता. तालुक्यातील रस्ते म्हणजे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता, हेच कळत नव्हते. मी आमदार झाल्यानंतर रस्त्यांना प्राधान्य दिले, असे ते म्हणाले. यावेळी अतुल लोखंडे, शंकर पाडळे, विवेक पवार, महेंद्र थोरात, हर्षवर्धन वीर, अमोल पवार, सुधीर घेगडे, संतोष डफळ, अर्जुन पवार, माणिक पवार, अमोल देशमुख, राजेंद्र पवार, संभाजी धावडे, दीनानाथ डफळ, वाल्मीक डफळ उपस्थित होते.