शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

 करंजी घाटात ट्रक-टँकरचा भीषण अपघात, दोन्ही वाहनांचे चालक ठार

By साहेबराव नरसाळे | Updated: October 17, 2023 18:45 IST

पैठण तालुक्यातील विहामांडवा येथील जावेद शेख हे ट्रक (क्र. एमएच-१६, सीसी-२३४७) मधून शेंगादाण्याचे कट्टे घेऊन अहमदनगरच्या दिशेने चालले होते.

करंजी (अहमदनगर) : कल्याण-निर्मळ महामार्गावरील करंजी (ता. पाथर्डी) घाटाच्या पायथ्याला ट्रक आणि दुधाच्या टँकरची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे चालक ठार झाले तर अन्य दोनजण गंभीर जखमी झाले. जावेद मन्सुर शेख व शिवाजी नानासाहेब भवार अशी अपघातात मयत झालेल्या चालकांची नावे आहेत. कल्याण-निर्मळ महामार्गावरील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटाच्या पायथ्याशी सोमवारी (दि.१६) रात्री उशिरा साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. 

पैठण तालुक्यातील विहामांडवा येथील जावेद शेख हे ट्रक (क्र. एमएच-१६, सीसी-२३४७) मधून शेंगादाण्याचे कट्टे घेऊन अहमदनगरच्या दिशेने चालले होते. तर दुधाचा रिकामा टँकर (क्र. एमएच-१६-एवाय-९९७९) घेऊन शिवाजी भवार हे करंजीकडे येत होते. करंजी घाट संपल्यानंतर थोड्याच अंतरावर या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. यात ट्रक चालक जावेद मन्सुर शेख (रा. विहामांडवा, पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) व टँकर चालक शिवाजी नानासाहेब भवार (रा. निवडुंगे, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) हे दोघे ठार झाले. ट्रकमधील अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले. मध्यरात्री अपघात झाल्यामुळे जखमींना वेळेत मदत मिळाली नाही. परंतु धडक झाल्यानंतर मोठा आवाज झाला. या आवाजाने आजूबाजूचे लोक जागे झाले. छत्रपती शिवाजी प्रतिष्ठानच्या तरुणांनी अपघातस्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना मदत केली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAccidentअपघातDeathमृत्यू