नगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात : बापलेकीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 16:33 IST2019-01-16T16:33:04+5:302019-01-16T16:33:27+5:30
नगर-दौंड रस्त्यावर मढेवडगावमधील न्यू इंग्लिश स्कूलच्या गेट समोर दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक झाली.

नगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात : बापलेकीचा मृत्यू
मढेवडगाव : नगर-दौंड रस्त्यावर मढेवडगावमधील न्यू इंग्लिश स्कूलच्या गेट समोर दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक झाली. यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील बाबुर्डी येथील बापलेकीचा मृत्यू झाला. उसाच्या ट्रक्टरला ओव्हरटेक करताना हा अपघात झाला.
बाबुर्डी येथील चौरंगीनाथ विठोबा शिर्के संक्रांत सणामुळे आलेल्या मुलीला सासुरवाडीला सोडवण्यासाठी जात असताना हायस्कूल समोर समोरासमोर दोन गाड्यांच्या अपघातामुळे उसाच्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन चौरंगीनाथ जागीच ठार झाले. त्यांची मुलगी संगिता कदम (पिंपळगाव सुटी जि. पुणे) ही मुलगी दवाखान्यात नेत असताना मरण पावली. दुस-या गाडीवर पुणे जिल्ह्यातील दाम्पत्य होते तेही गंभीर जखमी झाले आहे. परंतु दैव बलवत्तर म्हणून दोन्ही मोटारसायकल वर लहान मुली सुखरूप बचावल्या.