महापालिकेत ठेकेदारांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:28 IST2021-02-05T06:28:05+5:302021-02-05T06:28:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : अत्यावश्यक कामाची देयके मिळावीत, या मागणीसाठी महापालिकेच्या ठेकेदारांनी सोमवारी सुरू केलेले उपोषण तिसऱ्या दिवशी ...

Fasting of contractors in the Municipal Corporation | महापालिकेत ठेकेदारांचे उपोषण

महापालिकेत ठेकेदारांचे उपोषण

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : अत्यावश्यक कामाची देयके मिळावीत, या मागणीसाठी महापालिकेच्या ठेकेदारांनी सोमवारी सुरू केलेले उपोषण तिसऱ्या दिवशी बुधवारीही सुरूच होते. दरम्यान, उपोषणात सहभागी झालेल्या दोघांची प्रकृती खालावल्याने त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. प्रशासनाकडून एकही अधिकारी ठेकेदाराकडे फिरकला नाही.

महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून अत्यावश्यक सेवा पुरविण्याच्या नावाखाली ठेकेदाराकडून रस्ते, ड्रेनेज, जलवाहिनी यासारखी कामे करून घेण्यात आली. ठेकेदारांना कामांची देयके अदा केली गेली नाही. महापालिकेने ठेकेदारांची देयके अदा करण्यासाठी ज्येष्ठता यादी तयार केली. परंतु, ज्येष्ठतेनुसारही देयके मिळालेली नाहीत. महापालिकेत देयकावरून प्रशासन व ठेकेदारात नेहमीच वाद होत असतात. मात्र ठेकेदाराच्या देयकावर तोडगा निघालेला नाही. मागील काही वर्षांपासून हा वाद सुरू असून, देयके न मिळाल्याने ठेकेदारांनी महापालिकेसमोर उपोषण सुरू केले आहे. ठेकेदारांनी सोमवारी सकाळपासून उपोषण सुरू केले. उपोषणात अनेक ठेकेदार सहभागी झाले असून, काहींनी पाठिंबा दिलेला आहे. जनाधार संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पोटे हेही उपोषणात सहभागी झाले. माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, निखील वारे यांनीही उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. उपोषणात शाहनवाज शेख, विजय शामलेट्टी, अमृत नागुल, सचिन लोटके, एस.बी. भोर आदी ठेकेदारांचा समावेश होता.

...

सूचना फोटो आहे.

Web Title: Fasting of contractors in the Municipal Corporation