महापालिकेसमोर ठेकेदारांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:31 IST2021-02-05T06:31:14+5:302021-02-05T06:31:14+5:30
अहमदनगर : महापालिकेत अनेक वर्षापासून थकीत असलेल्या छोट्या कामाच्या बिलांची देयके मिळत नसल्याने ठेकेदारांनी महापालिकेसमोर उपोषण केले. जन आधार ...

महापालिकेसमोर ठेकेदारांचे उपोषण
अहमदनगर : महापालिकेत अनेक वर्षापासून थकीत असलेल्या छोट्या कामाच्या बिलांची देयके मिळत नसल्याने ठेकेदारांनी महापालिकेसमोर उपोषण केले. जन आधार सामाजिक संघटनेनेही या आंदोलनास पाठिंबा दिला.
या उपोषणात एस. बी. भोर, शहानवाज शेख, अमृत नागूल, विजय समलेटी, अमृत वन्नम, आकिज सय्यद, सर्फराज सय्यद, संजय डुकरे, मोहसीन शेख आदी ठेकेदार सहभागी झाले होते. या उपोषणाला जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने प्रकाश पोटे यांनी पाठिंबा दिला.
महानगरपालिकेकडे विविध लेखक शीर्षकांतर्गत शेकडो देयके अनेक वर्षापासून अदा करण्यासाठी प्रलंबित आहेत. अनेक कामे अत्यावश्यक परिस्थितीत स्थानिक अडचण निवारण करण्यासाठी ठेकेदारांकडून करून घेण्यात आलेली आहेत. अशी कामे करणारे ठेकेदार हे सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. त्यातच सन २०२० हे कोरोना प्रादुर्भावात गेले. यामुळे सर्वांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे. ठेकेदारांना कोणत्याही प्रकारचे उत्पन्नाचे साधन उरलेले नाही. मुलांच्या शाळेची फी, कर्जाचे देणे, दैनंदिन गरजा व घर खर्च चालूच आहे. त्यामुळे ठेकेदारांची आर्थिक व मानसिक परिस्थिती बिघडत चालली आहे. चालू वर्षी अहमदनगर महानगरपालिकेची कर वसुली ही उच्चांकी म्हणजे ५० कोटींच्या पुढे झालेली आहे. कर वसुली झाली की देयके अदा करण्याचे आश्वासन महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आले होते. परंतु दरवर्षी पैसा महापालिकेच्या इतर खर्चापोटी खर्च होऊन ही छोटी देयके तशीच मागे पडत असल्याचे ठेकेदार आंदोलकांनी स्पष्ट केले.
डिसेंबर २०२० मध्ये आयुक्तांना निवेदन देऊन यावर चर्चाही झालेली आहे. तरी देखील ही देयके न मिळाल्याने ठेकेदारांना उपोषण करावे लागले, असे निवेदनात म्हटले आहे.
------------
फोटो - २५मनपा ठेकेदार उपोषण
महापालिकेत अनेक वर्षापासून थकीत असलेल्या छोट्या कामाच्या बिलांची देयके मिळत नसल्याने ठेकेदारांनी महापालिकेसमोर उपोषण केले.