ग्रामपंचायत संगणक परिचालकांचे मानधनासाठी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:22 IST2021-02-24T04:22:57+5:302021-02-24T04:22:57+5:30

याबाबत मळेगाव (ता. शेवगाव) येथील सुनीता वाणी व सासेगाव (जि. नागपूर) येथील सोनू तिरमारे यांनी हे उपोषण सुरू केले ...

Fast for Gram Panchayat Computer Operators' Honorarium | ग्रामपंचायत संगणक परिचालकांचे मानधनासाठी उपोषण

ग्रामपंचायत संगणक परिचालकांचे मानधनासाठी उपोषण

याबाबत मळेगाव (ता. शेवगाव) येथील सुनीता वाणी व सासेगाव (जि. नागपूर) येथील सोनू तिरमारे यांनी हे उपोषण सुरू केले असून, त्यांना इतर परिचालकांनी पाठिंबा दिला आहे. सर्व संगणक परिचालक महाराष्ट्रात २०११ पासून काम करत आहेत. परंतु, त्यांना देण्यात येणारे मानधन तुटपुंजे आहे, तेही वेेळेवर मिळत नाही. कंपनीच्या ठेकेदाराकडून कर्मचाऱ्यांची पिळवणूक होते. ग्रामपंचायतकडून ते एकरकमी धनादेश घेतात व त्यातील अर्धा भागही कर्मचाऱ्यांना मिळत नाही. याबाबत शासनाचे वेळोवेळी लक्ष वेधले आहे. परंतु, त्याचा उपयोग झालेला नाही.

मानधन दर महिन्याला एकाच तारखेला देण्यात यावे, नोकरीची सुरक्षा देण्यात यावी, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा, १० ते १२ हजार किमान मानधन मिळावे, कामावरून कमी केलेल्या संगणक परिचालकांना परत कामावर घेण्यात यावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे.

-----------

फोटो - २३संगणक परिचालक आंदोलन

मानधनवाढीसह इतर मागण्यांसाठी संगणक परिचालकांनी जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले आहे.

Web Title: Fast for Gram Panchayat Computer Operators' Honorarium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.