शेतकरी, साखर कारखान्याचे हित जोपासणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:20 IST2021-03-10T04:20:56+5:302021-03-10T04:20:56+5:30
टाकळी ढोकेश्वर : भविष्यकाळात बँकेचा कारभार करताना प्रथमतः तांत्रिकदृष्ट्या आधुनिकता आणणे गरजेचे आहे. ...

शेतकरी, साखर कारखान्याचे हित जोपासणार
टाकळी ढोकेश्वर : भविष्यकाळात बँकेचा कारभार करताना प्रथमतः तांत्रिकदृष्ट्या आधुनिकता आणणे गरजेचे आहे. तरुण खातेदार जोडण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. शेतकरी, साखर कारखान्यांचे हित जोपासणार आहे. कर्जपुरवठा, वसुलीवर जोर देणार असल्याचे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांनी सांगितले.
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर टाकळीढोकेश्वर येथे उदय शेळके यांचा शनिवारी सत्कार करण्यात आला. यावेळी शेळके बोलत होते. जिल्हा बँकेला पूर्ण वैभव प्राप्त करून देणार आहे. ज्येष्ठ व तज्ज्ञ संचालकांनी माझ्यावर विश्वास दाखवत मला अध्यक्षपदाची संधी दिली, असेही ते म्हणाले.
याप्रसंगी शरद झावरे, दादा भालेकर, भिकाजी धुमाळ उपस्थित होते.
>