अकोले : अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनी निळवंडे कालव्यांचे काम आज दुपारी एक वाजता बंद पाडले. या आंदोलनात आमदार वैभव पिचड सहभागी झाले होते. त्यावेळी आमदार पिचड व अधिका-यांमध्ये चर्चा झाली. शेतक-यांसह बैठक घेऊन नंतरच काम सुरू करू, असे अधिका-यांनी सांगितल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.निळवंडे कालव्यांचे काम भूमिगतच करावे, अशी मागणी या शेतक-यांची आहे. निळवंडे धरणापासून काही अंतरावर कालव्याचे काम सुरू करण्यासाठी मजूर, यंत्रे आणण्यात आली होती. त्यावेळी अकोले तालुक्यातील कालवाग्रस्त शेतकरी तेथे आले. त्यांनी कामावरील मशीनरींपुढेच ठिय्या दिला. काही वेळात आमदार वैभव पिचडही तेथे आले. तेही शेतक-यांसह आंदोलनात सहभागी झाले. यानंतर अधिका-यांनी आमदारांसह शेतक-यांशी चर्चा केली. लवकरच बैठक घेऊन शेतक-यांशी चर्चा करू आणि नंतरच काम सुरू करू, असे अधिकाºयांनी सांगितल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
शेतक-यांनी रोेखले निळवंडे कालव्यांचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 15:53 IST