शहरटाकळीत पावसाच्या दमदार आगमनामुळे शेतकऱ्यांचे वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:17 IST2021-06-04T04:17:15+5:302021-06-04T04:17:15+5:30
दहिगावने : पहिल्या पावसाच्या जोरदार आगमनामुळे शेतकरी हर्षित झाले. या आनंदात शहरटाकळी (ता.शेवगाव) येथील शेतकऱ्यांनी वृक्षारोपण करत समाजापुढे नवा ...

शहरटाकळीत पावसाच्या दमदार आगमनामुळे शेतकऱ्यांचे वृक्षारोपण
दहिगावने : पहिल्या पावसाच्या जोरदार आगमनामुळे शेतकरी हर्षित झाले. या आनंदात शहरटाकळी (ता.शेवगाव) येथील शेतकऱ्यांनी वृक्षारोपण करत समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला.
शहरटाकळी व परिसरात मंगळवारी जोरदार पावसाचे आगमन झाले. मान्सूनपूर्व झालेला हा पाऊस शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाचा शुभसंकेत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. नेते मंडळी, युवा कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने होणारे वृक्षारोपण आजकाल ट्रेंडच झाले आहे. पावसाच्या दमदार आगमनानंतर हर्षित झालेल्या शिवाजी कुंडकर यांनी आपल्या शहरटाकळी येथील शेतात आंबा, लिंबोणी, पेरू अशा फळझाडांचे लहान मुलांच्या हस्ते वृक्षारोपण केले. या वृक्षांचे संगोपन करण्याचा संकल्प केला. अंकुश वाघ, जनार्धन कुंडकर, राम खंडागळे, गोरख कावले, बाबासाहेब कांबळे, निखिल कुंडकर, अशोक जाधव आदींसह शेतकरी उपस्थित होते.
---
०३ शहरटाकळी
शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथे पावसाच्या दमदार आगमनाच्या आनंदात शेतकऱ्यांनी वृक्षारोपण केले.