दिल्लीच्या आंदोलनाला शेतकऱ्यांचा पाठिंबा
By | Updated: December 6, 2020 04:21 IST2020-12-06T04:21:47+5:302020-12-06T04:21:47+5:30
अहमदनगर : गेल्या एक आठवड्यापासून दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. शनिवारी ...

दिल्लीच्या आंदोलनाला शेतकऱ्यांचा पाठिंबा
अहमदनगर : गेल्या एक आठवड्यापासून दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. तसेच शेतकऱ्यांनी पुकारलेल्या ८ डिसेंबरच्या बंदमध्ये सहभागी होवून जेलभरो आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले.
या आंदोलनात राजेंद्र करंदीकर, डॉ. भास्कर रणनवरे, बाळासाहेब पातारे, सुभाष गायकवाड, सुरेश गायकवाड, संपत पवार, सुधाकर पातारे, मुक्ती अल्ताफ, जैद शेख, अशोक साळवे, श्याम काते, इमरान सय्यद, शिवाजी भोसले, अशोक साळवे, मनोहर वाघ आदी सहभागी झाले होते. विविध राज्यांतून आलेल्या शेतकऱ्यांचे दिल्ली येथे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने संपूर्ण देशातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने आंदोलनास सक्रिय पाठिंबा देण्यात आला.
केंद्र सरकारने शेतकरीविरोधात मंजूर केलेले तीन काळे कायदे त्वरित मागे घेण्यात यावे, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव मिळावा व शेतकऱ्यांकडून अल्प दरात माल खरेदी करुन जास्त भावाने विक्री करणाऱ्या दलालांवर कारवाई होण्यासाठी लोकसभेत नवीन कायदा पारित करावा, निवडणुका ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
---------------
फोटो- ०५ किसान मोर्चा आंदोलन
राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारचा निषेध करताना राजेंद्र करंदीकर व कार्यकर्ते.