शेतकऱ्यांनी पिकांची ऑनलाइन नोंदणी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:20 IST2021-09-13T04:20:31+5:302021-09-13T04:20:31+5:30
टाकळीभान येथील तलाठी कार्यालयात ई-पीक पाहणीबाबत आढावा घेण्यासाठी शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी तहसीलदार प्रशांत पाटील बोलत ...

शेतकऱ्यांनी पिकांची ऑनलाइन नोंदणी करावी
टाकळीभान येथील तलाठी कार्यालयात ई-पीक पाहणीबाबत आढावा घेण्यासाठी शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी तहसीलदार प्रशांत पाटील बोलत होते.
पाटील म्हणाले, इतर सर्व गावांत ई-पीक पाहणी नोंदणी जोरात सुरू आहे. मात्र, तालुक्यातील टाकळीभान हे मोठे गाव असूनही येथील ई-पीक पाहणी नोंदणीचे काम इतर गावांच्या तुलनेत फार कमी असल्याने, नेमकी काय अडचण निर्माण झाली आहे, यासाठी ही आढावा बैठक घेतली आहे. ई पीक पाहणी हा शासनाचा स्तुत्य असा उपक्रम आहे. त्यामुळे पिकांचे अचूक क्षेत्र कळणार असून, मोबाइल ॲप्लिकेशनमध्ये शेतकरी पिकांची माहिती भरतील व तलाठी या पिकांच्या नोंदी तपासून घेतील. त्यामुळे पीक पेरणीची रियल टाइम माहिती ॲप्लिकेशनमध्ये संकलित होणार असल्याने, सर्व शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी नोंदणी करावी. यावळी राजेंद्र कोकणे, भारत भवार व ग्रामस्थांच्या वतीने प्रशांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला. या बैठकीनंतर तलाठी अरुण हिवाळे, संदीप जाधव, कोतवाल सदाशिव रणनवरे यांनी शेतात जाऊन ई-पीक पाहणी केली. यावेळी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष राजेंद्र कोकणे, भारत भवार, उपसरपंच कान्हा खंडागळे, आबासाहेब रणनवरे, यशवंत रणनवरे, भैया पठाण, सुनील बोडखे, सुनील रणनवरे, मोहन रणनवरे, भाऊसाहेब पटारे, बंडू बोडखे, महेंद्र संत, विलास सपकळ उपस्थित होते.