शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सरकारमध्ये शेतक-यांची मुले हवीत-सचिन पायलट;  खांडेकर, गांधी, शेरकर यांना संगमनेरात पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 18:30 IST

देशातील नियम व कायदे बनविण्यासाठी विधानसभा आणि लोकसभेत शेतक-यांची मुले पाहिजेत. त्यांनी शेतीप्रधान भारताच्या नागरिकांसाठी चांगले काम केले पाहिजे. महाराष्ट्रात नव्याने आलेल्या महाआघाडी सरकारकडून जनतेच्या असलेल्या अपेक्षा पूर्ण होतील, असे मत राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी व्यक्त केले. 

संगमनेर : देशातील नियम व कायदे बनविण्यासाठी विधानसभा आणि लोकसभेत शेतक-यांची मुले पाहिजेत. त्यांनी शेतीप्रधान भारताच्या नागरिकांसाठी चांगले काम केले पाहिजे. महाराष्ट्रात नव्याने आलेल्या महाआघाडी सरकारकडून जनतेच्या असलेल्या अपेक्षा पूर्ण होतील, असे मत राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी व्यक्त केले. मालपाणी लॉन्स येथे झालेल्या स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व हरित क्रांतीचे प्रणेते डॉ.अण्णासाहेब शिंंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त पुरस्कार वितरण सोहळ््यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभचे अध्यक्ष नाना पटोले होते. व्यासपीठावर महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर, डॉ. गिरीश गांधी, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, आमदार डॉ.किरण लहामटे, आमदार हिरामण खोसकर उपस्थित होते. पायलट पुढे म्हणाले, महाराष्ट्र व राजस्थानचे पुर्वीपासूनचे विश्वासाचे दृढ नाते आहे.  महसूलमंत्री थोरात यांच्यातील नम्रता व प्रत्येकाच्या हदयातील असणारे स्थान हे नव्या पिढीसाठी अनुकरणीय आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे यांनी केलेल्या रचनात्मक व दिशादर्शक कामामुळे नगरचे नाव देशपातळीवर आहे. खांडेकर, गांधी, शेरकर यांना पुरस्कारअमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने सहकार, साहित्य, समाजसेवा, पर्यावरण या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असणा-या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार व एक लाख रुपये रोख रक्कम एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांना प्रदान करण्यात आला. डॉ. अण्णासाहेब शिंदे पुरस्कार व एक लाख रुपये रोख रक्कम. पर्यावरणामध्ये डॉ. गिरीश गांधी यांना तर सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार सत्यशील व योगिता शेरकर यांना स्मृतीचिन्ह व एकावन्न हजार रुपयांची रोख रक्कम या पुरस्काराने  गौरविण्यात आले.राज्यात ब्रम्हा, विष्णू, महेश असे विकासाचे सरकार नाना पटोले म्हणाले, सध्या राज्यात ब्रम्हा, विष्णू व महेश असे विकासाचे सरकार आहे. या सरकारने प्रथम शेतक-यांची कर्जमाफी करुन एक मोठा ऐतिहासीक निर्णय घेतला आहे. मी विधानसभा अध्यक्ष म्हणून जनतेचा प्रतिनिधी म्हणून काम करीत असून जनतेची कामे सरकारकडून करुन घेणार आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातSangamnerसंगमनेर