शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:18 IST2021-03-24T04:18:37+5:302021-03-24T04:18:37+5:30
निवेदनाची प्रत नायब तहसीलदार व्ही. के. जोशी, कृषी अधिकारी कानिफनाथ मरकड यांना देण्यात आली. यावेळी जनशक्तीचे उपाध्यक्ष संजय आंधळे, ...

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी
निवेदनाची प्रत नायब तहसीलदार व्ही. के. जोशी, कृषी अधिकारी कानिफनाथ मरकड यांना देण्यात आली. यावेळी जनशक्तीचे उपाध्यक्ष संजय आंधळे, सचिव जगन्नाथ दादा गावडे, विष्णू दिवटे, राजेंद्र पोटफोडे, ज्ञानेश्वर काटे, महादेव डोंगरे, जगताप विजय, पांडुरंग मराठे, विजय काटे, तुलशीराम रुईकर, दिनकर ढाकणे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
वारंवार येणाऱ्या रोगराईमुळे, अवेळी झालेल्या पावसामुळे, नापिकीमुळे तसेच विविध संकटांमुळे शेती पिकांवर आपत्ती येते. हातातोंडाशी आलेला घास डोळ्यादेखत हिरावला जातो. नुकसान भरपाई मिळावी, यासाठी पंचनामे करण्याची मागणी केली जाते, पंचनामे देखील होतात, त्यानुसार कधी नुकसान भरपाई मिळते तर कधी मिळतही नाही. मिळणाऱ्या भरपाईचे प्रमाण इतके अल्प असते की, शेतकऱ्यांची चेष्टा केल्यासारखेच होते. नुकसान भरपाई देताना सातत्याने मंडलानुसार सर्वेक्षण केले जाते.
विविध प्रगत देशात नुकसान भरपाईचे निकष हे त्या त्या शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानीचे प्रमाण पाहून संपूर्ण भरपाई करून दिली जाते. मंडल हा घटक रद्द करून त्या-त्या गावच्या शेतकऱ्यांचा गट नंबर हा घटक धरून नुकसान भरपाईचे निकष ठेवण्यात यावे. आधुनिक तंत्रज्ञान एवढे प्रगत झाले आहे की, त्या-त्या गटात नुकसान झालेले आहे की नाही, हे सॅटेलाईटद्वारे पाहणे देखील शक्य आहे.
शेतकऱ्यांना स्वाभिमानाने जगता यावे, यासाठी सॅटेलाईटद्वारे त्या गट नंबरची पाहणी करून झालेल्या नुकसान भरपाईचा अंदाज घेऊन, शेतकऱ्यांच्या खात्यात न मागता नुकसान भरपाईची रक्कम प्रदान करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे.
२३ शेवगाव