शेतकर्यांनी शिल्लक सोयाबिन बियाण्यांची उगवण तपासावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:33 IST2021-05-05T04:33:26+5:302021-05-05T04:33:26+5:30
नगर तालुक्यातील विविध गावांत कृषी विभागाच्यावतीने तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सोयाबिन बियाणे उगवण क्षमता तपासणी व ...

शेतकर्यांनी शिल्लक सोयाबिन बियाण्यांची उगवण तपासावी
नगर तालुक्यातील विविध गावांत कृषी विभागाच्यावतीने तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सोयाबिन बियाणे उगवण क्षमता तपासणी व बीज प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी डोंगरगण येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी मंडल कृषी अधिकारी सूर्यकांत शेकडे, मारुती गवारे, अर्जुन काळे, रामदास काळे, गोरख लांडगे, पंचायत समिती सदस्य व्ही. डी. काळे, सीताराम पटारे, शिवाजी जाधव, निवृत्ती मगर, गंगाधर पटारे, योगेश खेत्री आदी उपस्थित होते.
मंडल कृषी अधिकारी सूर्यकांत शेकडे म्हणाले की, या व्यतिरिक्त येत्या खरीप हंगामात हुमबी कीड, मका पिकावरील लष्करी अळी, कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण व बी.बी.एफ. यंत्राद्वारे पेरणी करणे, तसेच माती परीक्षणावर आधारित खतांचा वापर करणे आदी मोहिमा हाती घेण्यात येतील.
हा उपक्रम मंडळातील बहिरवाडी, देहरे, डोंगरगण, पिंपळगाव माळवी, शेंडी गावातील शेतकर्यांकडे घेण्यात आला. इतर गावांमध्ये हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषी पर्यवेक्षक आर. एम. गोसावी, कृषी सहाय्यक डी. जी. गुंड, के. डी. मदने, एस. बी. फलके, ए. बी. डुक्रे, एस. बी. वाणी, एस. सी. मेचकर आदींनी परिश्रम घेतले.
.......
ओळी- नगर तालुक्यातील डोंगरगण येथे कृषी विभागाच्यावतीने तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सोयाबिन बियाणे उगवण क्षमता तपासणी व बीजप्रक्रिया करण्यात आली.
फोटो मेलवरअहे