शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी पक्षनेते विखे यांच्या लोणीत शेतक-यांचा आत्मक्लेश सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 13:15 IST

आजपासून (गुरुवार, दि. ७) लोणी येथे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळ्यासमोरच शेतकरी संघर्ष समितीने आत्मक्लेश आंदोलन सुरु केले आहे. तर नगर, औरंगाबाद, बीड, जालना, सोलापूर आदी जिल्ह्यातून आलेल्या २१ शेतक-यांनी विखे यांच्या पुतळ्यासमोर अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे.

अहमदनगर : जिल्ह्यातील साखर कारखानदारांचा २३०० रुपये दराचा प्रस्ताव धुडकावून लावल्यानंतर आजपासून (गुरुवार, दि. ७) लोणी येथे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळ्यासमोरच शेतकरी संघर्ष समितीने आत्मक्लेश आंदोलन सुरु केले आहे. तर नगर, औरंगाबाद, बीड, जालना, सोलापूर आदी जिल्ह्यातून आलेल्या २१ शेतक-यांनी विखे यांच्या पुतळ्यासमोर अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. संगमनेर लोणी रस्त्यावर विखे यांच्या पुतळ्यासमोर उपोषण सुरु करण्यात आले.आंदोलकांना अटक केल्यास अन्नत्यागासह पाणीही वर्ज्य करण्यात येणार असल्याचे शेतकरी संघर्ष समितीचे नेते डॉ. अजित नवले यांनी सांगितले.लोणी हे गाव विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे आहे. त्यामुळे लोणी ग्रामस्थांनी २०१४ साली ग्रामसभेने घेतलेल्या ठरावाचा हवाला देत शेतक-यांच्या आत्मक्लेश आंदोलनाला विरोध दर्शविला होता. जिल्हा प्रशासनानेही लोणी येथे आंदोलन करण्यास परवानगी नाकारली होती. त्या पार्श्वभूमीवर लोणीतील आंदोलन चिघळण्याची शक्यता गृहित धरुन पोलिसांचा मोठा फौजफाटा लोणीत दाखल झाला आहे. 

सकाळी ९ वाजता आत्मक्लेश आंदोलन सुरु करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. तथापि, हे आंदोलन सकाळी १ वाजता सुरु करण्यात आले. ११ वाजल्यापासून शेतकरी संघर्ष समितीचे नेते लोणी येथे दाखल होण्यास सुरुवात झाली. त्यावेळी माध्यमांशी बोलताना डॉ. अजित नवले म्हणाले, आत्मक्लेश आंदोलनाला प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. तरीही आम्ही आत्मक्लेश आंदोलन करणारच आहोत. या आंदोलनात आम्ही पाणीही घेणार नाही. आम्हाला आंदोलनापासून कोणीही रोखू शकत नाही. हे आंदोलन कोणा व्यक्तीविरोधात नसून सरकारविरोधात आहे. आमचे आंदोलन चिरडण्याचा पोलिसांचा डाव आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSugar factoryसाखर कारखानेRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील