पाण्यासाठी शेतकरी रस्त्यावर

By Admin | Updated: December 15, 2015 23:15 IST2015-12-15T23:03:18+5:302015-12-15T23:15:41+5:30

नेवासा : भानसहिवरा परिसरातील शेतकऱ्यांच्यावतीने मंगळवारी नेवासा-शेवगाव मार्गावरील भानसहिवरा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Farmers on the road to the water | पाण्यासाठी शेतकरी रस्त्यावर

पाण्यासाठी शेतकरी रस्त्यावर

नेवासा : सर्व चाऱ्यांना पाटपाणी मिळावे, या प्रमुख मागणीसाठी नेवासा तालुक्यातील भानसहिवरा परिसरातील शेतकऱ्यांच्यावतीने मंगळवारी नेवासा-शेवगाव मार्गावरील भानसहिवरा येथे रास्ता रोको आंदोलन
करण्यात आले. आंदोलन दीड तास चालले.
या आंदोलनाचे नेतृत्व भाजपा युवा मोर्चाचे नेवासा तालुकाध्यक्ष लक्ष्मण मोहिते यांनी केले.
मोेहिते म्हणाले, शासनाने शेतकऱ्यांचा पाण्याबाबत अंत पाहू नये. अन्यथा शेतकऱ्यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. माजी सरपंच भगवान जाधव, ग्रामपंचायत सदस्य धनेश मुनोत, नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सयाजी ढवाण, बाबासाहेब ढवाण, सोमनाथ शेंडे, अशोक टाके यांचीही भाषणे झाली.
पाटबंधारे खात्याचे अधिकारी घुमरे यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. आंदोलनात भानसहिवरा तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
भानसहिवरा येथील रास्ता रोको आंदोलन दीड तास चालले. त्यामुळे नेवासा -शेवगाव मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. यामध्ये प्रवाशांचे हाल झाले.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Farmers on the road to the water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.