ऊस आंदोलन व गोळीबार प्रश्नावरुन शेतकरी संघटनांनी घेतला अहमदनगर साखर संकुलाचा ताबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 15:29 IST2017-11-16T15:28:16+5:302017-11-16T15:29:24+5:30
अहमदनगर : ऊस दरावरुन चिघळलेल्या आंदोलनातील शेतक-यांवर बुधवारी (दि़ १५) पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. त्यानंतर शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी येथील ...

ऊस आंदोलन व गोळीबार प्रश्नावरुन शेतकरी संघटनांनी घेतला अहमदनगर साखर संकुलाचा ताबा
अहमदनगर : ऊस दरावरुन चिघळलेल्या आंदोलनातील शेतक-यांवर बुधवारी (दि़ १५) पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. त्यानंतर शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी येथील साखर संकुलात ठिय्या आंदोलन केले. तसेच आंदोलकांनी अधिका-यांसह स्वत:लाही कोंडून घेतले.
या आंदोलनात शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक अजित नवले, बाबा आरगडे, अजय बारस्कर यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले.
शेवगाव तालुक्यातील आंदोलन चिघळण्यापूर्वीच प्रशासनाने ऊस दराचा प्रश्न का नाही सोडविला, शेतक-यांवर कोणाच्या आदेशाने गोळीबार करण्यात आला, सर्वच कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे दर का नाही दिला, एफआरपीप्रमाणे दर न देणा-या कारखान्यांवर काय कारवाई केली, असे विविध प्रश्न शेतकरी संघटनेने यावेळी उपस्थित केले.