किसान सभेचा मोर्चा
By Admin | Updated: July 15, 2014 00:45 IST2014-07-14T22:50:14+5:302014-07-15T00:45:45+5:30
अहमदनगर: जून पूर्णपणे कोरडा गेला आणि जुलैतही पावसाचा पत्ता नाही़ त्यामुळे नगर जिल्हा दुष्काळी जाहीर करण्याच्या मागणीसाठी
किसान सभेचा मोर्चा
अहमदनगर: जून पूर्णपणे कोरडा गेला आणि जुलैतही पावसाचा पत्ता नाही़ त्यामुळे नगर जिल्हा दुष्काळी जाहीर करण्याच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मोर्चा नेण्यात आला़ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत रस्ता रोको करण्यात आला़
किसान सभेचे अध्यक्ष कॉ़ राधेशाम गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला़जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत रस्ता रोको करण्यात आला़ यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे, की जिल्ह्यात भयंकर दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे़ जून कोरडा गेला़ जुलैत अत्यंत कमी पाऊस पडला़ त्यामुळे खरीपाच्या पेरण्या जवळ- जवळ गेल्या आहेत़ पिण्याच्या पाण्याचीही टंचाई निर्माण झाली आहे़ जनावरांना चारा राहिलेला नाही़ मजूरांना काम नसल्याने धान्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ त्यामुळे ग्रामिण भागात बिकट स्थिती निर्माण झाली असून, दुष्काळावर शासनाने तातडीने उपाय योजना करण्याची गरज आहे़ विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी मदत जाहीर करावी़ शासनाची मदत शेतकरी, कष्टकरी वर्गापर्यंत पोहोचली पाहिजे, अशी मागणी केली आहे़ आंदोलनकर्त्यांत कॉ़ आझाद ठुबे, अॅड़ शांताराम वाळुंज, अॅड़ रमेश नागवडे, कॉ़ आप्पासाहेब वाबळे, कॉ़ शशिकांत कुलकर्णी, अॅड़ सुधीर टोकेकर, अॅड़ बन्सी सातपुते आदींचा सहभाग होता़
अशा आहेत कम्युनिस्टांच्या मागण्या
जिल्हा दुष्काळी जाहीर करा
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
जनावरांसाठी चारा निर्मिती
शेती पंपाची थकीत बिले माफ करा
शेतकऱ्यांचे थकीत कर्ज माफ करा
सन २०१२-१३ ची नुकसान भरपाई
दुष्काळी अनुदान मिळावे