विहिरीत पडलेल्या हरणाला शेतकऱ्यांनी दिले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:19 IST2021-03-15T04:19:26+5:302021-03-15T04:19:26+5:30

घारगाव : संगमनेर तालुक्यातील जांबुत बुद्रुक येथील एका चाळीस फूट खोल विहिरीत पडलेल्या हरणाला शेतकऱ्यांनी सुखरूप बाहेर काढले. ...

Farmers gave life to the deer that fell into the well | विहिरीत पडलेल्या हरणाला शेतकऱ्यांनी दिले जीवदान

विहिरीत पडलेल्या हरणाला शेतकऱ्यांनी दिले जीवदान

घारगाव : संगमनेर तालुक्यातील जांबुत बुद्रुक येथील एका चाळीस फूट खोल विहिरीत पडलेल्या हरणाला शेतकऱ्यांनी सुखरूप बाहेर काढले. यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी हरणाच्या पायाला झालेल्या जखमेवर उपचार करून पुन्हा निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिले आहे. ही घटना शनिवारी सकाळी घडली.

याबाबत माहिती अशी की, जांबुत बुद्रुक शिवारात यशवंत मेंगाळ, नामदेव मेंगाळ, नारायण मेंगाळ, फारूक सय्यद या चौघा शेतकऱ्यांची एकत्रित विहीर आहे. शनिवारी सकाळी हे सर्व जण विहिरीपासून काही अंतरावर होते. त्याचवेळी हरीण विहिरीत पडल्याचे त्यांनी पाहिले. या शेतकऱ्यांनी विहिरीच्या दिशेने धाव घेतली. शेतकऱ्यांनी हरणाला विहिरीतून सुखरूप बाहेर काढले. हरणाच्या पायाला जखम झाली होती. शेतकऱ्यांनी घटनेची माहिती वनविभागाला दिली. वनसेवक रोहिदास भोईटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. हरणाच्या पायावर औषध उपचार करून त्याला निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिले.

Web Title: Farmers gave life to the deer that fell into the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.