कांदा बियाणात शेतक-याची फसवणूक : शेतक-याची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 17:29 IST2019-03-23T17:28:24+5:302019-03-23T17:29:43+5:30
कांदा बियाण्यात फसवणूक झाली असल्याची तक्रार येथील शेतकरी अनिल वलटे यांनी कोपरगाव तालुका कृषी आधिकारी कोपरगाव यांच्याकडे केली आहे.

कांदा बियाणात शेतक-याची फसवणूक : शेतक-याची तक्रार
दहिगाव बोलका : कांदा बियाण्यात फसवणूक झाली असल्याची तक्रार येथील शेतकरी अनिल वलटे यांनी कोपरगाव तालुका कृषी आधिकारी कोपरगाव यांच्याकडे केली आहे.
खरीप हंगाम २०१८-१९ मध्ये माझ्या शेतात लाल कांद्याची लागवड केली होती. त्यासाठी मी पंचगंगा कंपनीचे ओनियन एक्सपर्ट स्पेशल हे बियाणे वापरले होते. कांद्याची वाढ पूर्ण झाल्यानंतर त्यात जोडकांद्याचे प्रमाण ४० टक्क्यांपेक्षा जास्त निघाले आहेत. सध्या बाजारात लाल कांद्याला भाव नाही. त्यातच माझ्या कांद्यात जोडकांदा जास्त असल्याने तो विकला जात नाही. त्यामुळे माझे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तरी कंपनीकडून योग्य ती नुकसान भरपाई मिळण्याची मागणी त्यांनी तक्रारीव्दारे केली आहे. निवेदनाच्या प्रती संबंधितांना पाठविण्यात आल्या आहेत.
अनिल वलटे या शेतक-याची तक्रार मला मिळाली. मी प्रत्यक्ष शेतात भेट दिली असता वलटे यांनी पूर्ण कांदा पिकाची काढणी केली आहे. तो कांदा शेतात साठवून ठेवला आहे. त्यात मोठ्या प्रमाणात जोड कांद्याचे प्रमाण आढळून आले आहेत. -पंडीत वाघिरे, तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती, कोपरगाव.