शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

नगरमध्ये शेतकरी कर्जमाफीचा घोळ सुरुच; आता सहकारी संस्थांमधील कर्मचा-यांना कर्जमाफी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 19:31 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकरी कर्जमाफीचा याद्यांवर याद्या पाठविण्याचा पाढा अजूनही सुरूच आहे. दरम्यान जिल्हा बँकेने सहकार आयुक्तांकडे मार्गदर्शन मागितल्यानंतर तब्बल ९१ अपात्र शेतक-यांची नावे वगळण्यात आली आहे. त्यामुळे कर्जमाफीचे ८६ लाख रूपये वाचले आहेत.

ठळक मुद्देसरकारकडून बँकेला येतात निव्वळ शेतक-यांच्या नावाच्या याद्या

अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकरी कर्जमाफीचा याद्यांवर याद्या पाठविण्याचा पाढा सरकारकडून अजूनही सुरूच आहे. दरम्यान जिल्हा बँकेने सहकार आयुक्तांकडे मार्गदर्शन मागितल्यानंतर तब्बल ९१ अपात्र शेतक-यांची नावे वगळण्यात आली आहे. त्यामुळे कर्जमाफीचे ८६ लाख रूपये वाचले आहेत.योजनेच्या लाभासाठी जिल्हा बँकेने गाव पातळीवरील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या पातळीवरील थकबाकीदार शेतक-यांच्या याद्या तयार करून सहकार विभागास तसेच मंत्रालयातील माहिती तंत्रज्ञान विभागास देण्यात आल्या. या याद्या अपलोड झाल्यानंतर मंजूर शेतक-यांची नावे ग्रीन लिस्टमध्ये, त्रुटी असलेल्या शेतक-यांची नावे यलो लिस्टमध्ये तर नामंजूर शेतक-यांची नावे रेड लिस्टमध्ये प्रसिद्ध केली जाणार होती. कर्जमुक्तीची प्रमाणपत्रे वाटप झाल्यानंतरही अधिकृतपणे एकही यादी प्रसिद्ध झालेली नाही. ‘आपले सरकार’ पोर्टलवर योजनेच्या संकेतस्थळावर ग्रीन लिस्ट झळकल्या असल्या तरी याही याद्या बँकांमार्फत सहकार खात्याकडून अधिकृतपणे मिळालेल्या नाहीत.अहमदनगर जिल्हा बँकेच्या कर्जमाफी खात्यात ३ हजार ३४७ शेतकºयांचे १८ कोटी रूपये जमा झाले आहेत. पण गाव व नाव एवढीच ही यादी आहे. सेवा संस्थेच्या नावानिशी ही यादी नसल्याने यादीतील सभासद पात्र आहेत की नाहीत, नेमके पात्र सभासद कोणते? हे शोधायचे? ठरवायचे कसे? असा पेच निर्माण झाल्याने बँकेने सहकार आयुक्तांचे मार्गदर्शन मागविले. पण १५ दिवसात हे मार्गदर्शनदेखील न मिळाल्याने १८ कोटी रुपये पडून आहेत. मार्गदर्शन मागविल्यानंतर सहकार आयुक्तांकडून जिल्हा बँकेस यापूर्वी पाठविलेल्या ३३४७ शेतक-यांच्या यादीतून ९१ शेतक-यांची नावे वगळण्यास सांगण्यात आली आहेत. यात पती-पत्नी असे दोघेही लाभार्थी असल्याने व त्यांच्या कर्जमाफीची रक्कम दीड लाखांहून अधिक होत असल्याने त्यांची नावे वगळण्यास सांगण्यात आल्याचे समजते. पूर्वीच्या यादीप्रमाणे त्यांना रकमा वर्ग केल्या असत्या तर जिल्हा बँकेचे ८६ लाख रूपये चुकीच्या खात्यांमध्ये वर्ग होऊन त्याचा बँकेस आर्थिक फटका बसला असता.

याद्यांवर याद्या

दिवाळीच्या सुट्ट्यानंतर माहिती तंत्रज्ञान विभागाने जिल्हा बँक व सहकार खात्याकडून नव्याने पात्र शेतक-यांच्या याद्या मागविल्या. त्यानुसार पूर्णपणे नव्याने याद्या अपलोड करण्यात आल्या आहेत. आता सोमवारी पुन्हा ‘एक्सेल’फॉरमॅटमध्ये या याद्या मागविण्यात आल्या आहेत.

पदाधिका-यांची माहिती मागविली

सहकारी संस्थांच्या पदाधिका-यांसोबतच तेथील कर्मचा-यांच्याही याद्याही मागविण्यात आल्या आहेत. पदाधिका-यांच्या मातु:श्रीच्या नावासोबतच जन्मस्थळाची देखील माहिती मागविली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरीahmednagar district bankनगर जिल्हा सहकारी बँकGovernmentसरकार