कोपरगाव : राष्ट्रीय अन्नसुरक्षा व्यापारी पिके ऊस विकास अभियानाअंतर्गत तालुक्यातील कोकमठाण रेलवाडी परिसरातील पांडुरंग लोंढे यांच्या शेतावर शेतकरी दिन व शिवार भेट कार्यक्रम बुधवारी ( दि.२४) संपन्न झाला.
यावेळी कोपरगाव तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी शासनाच्या विविध कृषी योजना व सोयाबीन, कांदा पिकाबाबतचे व्यापारी धोरण व शाश्वत शेतीतून कृषी विकास कसा साधायचा याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे ऊस विकास अधिकारी शिवाजी देवकर, सभापती संभाजीराव रक्ताटे, कृषी सहायक नीलेश बिबवे यांनी कांदा लागवडीबाबतची माहिती दिली.
याप्रसंगी मंडल कृषी अधिकारी माधुरी गावडे, संगीता खंडागळे, तुषार वसईकर, दिनकर कोल्हे, अनिरुद्ध घुगे, अविनाश पिंपळे, वसंत पावरा, संजय घनकुटे, माजी सरपंच पोपट पवार, आप्पासाहेब लोहकने, सोपान रक्ताटे, बाबासाहेब रक्ताटे, पांडुरंग लोंढे, किशोर गायकवाड, रमेश गायकवाड, अरुण देशमुख, चांगदेव लोंढे उपस्थित होते.