कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या
By Admin | Updated: June 7, 2016 23:33 IST2016-06-07T23:26:15+5:302016-06-07T23:33:31+5:30
जामखेड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे आलेल्या नैराश्यातून तालुक्यातील देवदैठण येथील शेतकरी रमेश उर्फ सूर्यकांत परमेश्वर भोरे (वय ४०) यांनी विजेच्या खांबावरील तारांना चिटकून घेऊन आत्महत्या केली़

कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या
जामखेड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे आलेल्या नैराश्यातून तालुक्यातील देवदैठण येथील शेतकरी रमेश उर्फ सूर्यकांत परमेश्वर भोरे (वय ४०) यांनी विजेच्या खांबावरील तारांना चिटकून घेऊन आत्महत्या केली़ मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली़
भोरे यांच्यावर दोन वर्षांपासून देवदैठण सेवा संस्थेचे थकीत कर्ज होते. तसेच बँकेकडून गाई खरेदी करण्यासाठी कर्ज घेतले होते. व खाजगी लोकांचे देणे वाढले होते. त्यातच तीन वर्षांपासून सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे ते आर्थिक अडचणीत होते़ मयत भोरे यांच्यामागे पत्नी, आई-वडील, तीन मुली व दोन मुले असा परिवार आहे़ घटनेनंतर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले़ सायंकाळी पार्थिवावर देवदैठण येथे अंत्यसंस्कार करण्यात आले़