शेतकऱ्याने पेटविला शेतातच ऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:22 IST2021-03-05T04:22:11+5:302021-03-05T04:22:11+5:30

अहमदनगर : मुळा सहकारी कारखाना उसाची नोंद घेत नसल्याने तालुक्यातील हनुमानवाडी येथील शेतकऱ्याने उभ्या उसाच्या पिकासह मृद व जलसंधारण ...

The farmer lit sugarcane in the field | शेतकऱ्याने पेटविला शेतातच ऊस

शेतकऱ्याने पेटविला शेतातच ऊस

अहमदनगर : मुळा सहकारी कारखाना उसाची नोंद घेत नसल्याने तालुक्यातील हनुमानवाडी येथील शेतकऱ्याने उभ्या उसाच्या पिकासह मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे शेतातच दहन करून सरकारविरोधात रोष व्यक्त केला.

मागील पंधरा दिवसांत तालुक्यातील शेतकऱ्याने ऊस पेटविल्याची ही दुसरी घटना आहे. मागील महिन्यात जलसंधारण मंत्री गडाख यांच्यावर गंभीर आरोप करत करजगाव (ता. नेवासा) येथील अशोक टेमक यांनी आपला ऊस पेटवून दिला होता. मात्र तरीही कारखाना प्रशासन, जिल्हा प्रशासन तसेच साखर आयुक्त, राज्य सरकारने दखल घेतली नाही, असा आरोप करीत गुरुवारी दुपारी चार वाजता वसंतराव शेटे यांनी ऊस पेटवून दिला. या पुढील काळात आत्मदहन करू, असा इशारा शेटे यांनी दिला. यावेळी ऋषिकेश शेटे, प्रकाश शेटे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

काही राजकीय विरोधक फक्त बदनामी करण्यासाठी स्टंटबाजी करीत असल्याचे मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर यांनी सांगितले.

Web Title: The farmer lit sugarcane in the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.