बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
By Admin | Updated: February 21, 2016 23:47 IST2016-02-21T23:35:04+5:302016-02-21T23:47:40+5:30
निंबळक : शेतात काम करत असताना बिबट्याने अंगावर झेप मारल्याने पिंपळगाव वाघा येथील शेतकरी जखमी झाले.

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
निंबळक : शेतात काम करत असताना बिबट्याने अंगावर झेप मारल्याने पिंपळगाव वाघा येथील शेतकरी जखमी झाले. हातात कोयता असल्याने बिबट्याला मानेला चावा घेता आला नाही, मात्र त्याने डोक्यावर झडप घेतली. यात ते जबर जखमी झाले.
नगर शहरापासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंपळगाव वाघा (ता. नगर) येथील रावसाहेब वाबळे यांच्या वस्तीवर बिबट्या लपून बसला होता. रविवारी सकाळी ८ वाजता वाबळे हे शेतामध्ये जनावरांसाठी मका काढणीसाठी गेले होते. या मकामध्ये बिबट्या लपून बसला होता. आवाज आल्याने वाबळे यांनी काय आहे, हे पाहण्यासाठी गेले असता बिबट्याने त्यांच्या अंगावर झडप मारली. त्यांच्या हातात मका व कोयता असल्यामुळे त्याने डोके व खांद्यावर हल्ला करत त्यांना जखमी केले. वाबळे यांनी जोराने आरडाओरड सुरू केली असता जवळपास असणारे शेतकरी धावून गेले. बिबट्याने तेथून पळ काढला. वाबळे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती सध्या चांगली आहे. (वार्ताहर)