ट्रॅक्टर अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू
By Admin | Updated: May 3, 2017 19:11 IST2017-05-03T19:11:53+5:302017-05-03T19:11:53+5:30
ट्रॅक्टर अंगावर पडून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. कर्जत तालुक्यातील रवळगाव येथे सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला.

ट्रॅक्टर अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू
आॅनलाइन लोकमत
मिरजगाव (अहमदनगर), दि़ ३ - ट्रॅक्टर अंगावर पडून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. कर्जत तालुक्यातील रवळगाव येथे सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला.
आत्माराम विठोबा खेडकर (वय ३८) असे मयत तरूण शेतकऱ्याचे नाव आहे. नांगरट उरकून घराकडे परतत असताना रस्त्याच्या कडेला खड्ड्यात ट्रॅक्टर पलटी झाला. त्यानंतर जवळील वस्तीवरील लोकांनी ट्रॅक्टर उचलून त्याखाली दबलेले खेडकर यांना बाहेर काढून मिरजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले, परंतु त्याआधी त्यांचा मृत्यू झाला. खेडकर मिरजगाव येथे छायाचित्रकार होते. त्यांच्या पश्चात आई, वडील,पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. मंगळवारी सकाळी सात वाजता रवळगाव येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत मिरजगाव दूरक्षेत्रात अकस्मात मृत्युची नोंद झाली. अधिक तपास हे.कॉ. सुरेश बाबर करीत आहेत.