वडनेर बुद्रूकला फराळ, कपडे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:36 IST2021-03-13T04:36:44+5:302021-03-13T04:36:44+5:30

निघोज : पारनेर तालुक्यातील वडनेर बुद्रूक येथे आमदार नीलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना फराळ, कपडे, औषधांचे वाटप करण्यात ...

Faral to Wadner Budruk, distribution of clothes | वडनेर बुद्रूकला फराळ, कपडे वाटप

वडनेर बुद्रूकला फराळ, कपडे वाटप

निघोज : पारनेर तालुक्यातील वडनेर बुद्रूक येथे आमदार नीलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना फराळ, कपडे, औषधांचे वाटप करण्यात आले.

सामाजिक जाणिवेतून हा उपक्रम राबविल्याचे आदित्य बाबर यांनी सांगितले.

वडनेर बुद्रूक येथे गुरुवारी सकाळी ऊसतोड कामगार, शेतकरी, मजुरांना १०० टी शर्ट, आदित्य बाबर यांनी मोफत दिले. त्याबरोबर जखमेचा मलम, सर्दी, डोके, ताप, पोट, अंग, कणकण, जुलाब, उलटी या प्रकारची औषधे देण्यात आली. रवींद्र महाराज नऱ्हे, नीलेश लंके प्रतिष्ठान व संजय बाबर जनसेवा फाउंडेशन यांच्या वतीने १४ कुटुंबांना उबदार कपडे व लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ पदधिकारी दादाभाऊ थोरात, गणेश शेटे, ग्रा. पं. सदस्य राहुल बाबर, सेवा संस्था अध्यक्ष हनुमंत बाबर, अनंथा जगदाळे, रामदास भालेकर, स्वप्नील चौधरी, बाळासाहेब बाबर, गोरक्ष नऱ्हे, मिलिंद मेचे, स्वप्निल येवले, श्रीकांत चौधरी, चंद्रकांत वाजे, नारायण बाबर, गणेश चौधरी, संतोष गोरडे, कुंडलिक बाबर, रवींद्र नऱ्हे, साहेबराव वाजे, विकास बोचरे, संदीप चौधरी, विशाल जगदाळे, रोहित नऱ्हे, अरुण थोरात, प्रवीण चौधरी, सुदाम बाबर, तुळसाबाई बाबर, श्रावणी डोंगरे, परीक्षा शेटे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

---

११ निघोज

वडनेर बुद्रूक येथे गरजूंना फराळ, कपडे वाटप करण्यात आले.

Web Title: Faral to Wadner Budruk, distribution of clothes