वैद्यकीय बिले रखडल्याने शिक्षकेतर कर्मचाऱ्यासह कुुटुंबावर उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:14 IST2021-07-12T04:14:43+5:302021-07-12T04:14:43+5:30
विसापूर : शिक्षकेतर सेवकाची गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून कोरोना उपचाराची बिले रखडल्याने या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील ...

वैद्यकीय बिले रखडल्याने शिक्षकेतर कर्मचाऱ्यासह कुुटुंबावर उपासमारीची वेळ
विसापूर : शिक्षकेतर सेवकाची गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून कोरोना उपचाराची बिले रखडल्याने या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील चांभुर्डी येथील बाळकृष्ण रामचंद्र दळवी हे कोरेगव्हाण येथील कोरेश्वर विद्यालयात लेखनिक पदावर कार्यरत आहेत. ऑक्टोबर २०२० मध्ये बाळकृष्ण दळवी, त्यांची आई, पत्नी व मुलगा या चौघांना कोरोना लागण झाली होती. त्या सर्वांनी नगर येथील खासगी रुग्णालयात कोरोनावर उपचार घेतले. यामध्ये त्यांची ८१ वर्षांची आई व सर्वांनी कोरोनावर मात केली. यावेळी उपचारासाठी लाखो रुपये खर्च आला. त्यासाठी त्यांनी कर्मचारी सोसायटीचे कर्ज काढून दवाखान्यात बिले भरली. ती बिले त्यांनी वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाकडे मंजुरीसाठी पाठविली. मात्र, गेल्या नऊ महिन्यांपासून ती बिले मंजुरीविना रखडली आहेत. याबाबत दळवी यांनी दोन महिन्यांपूर्वी अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक अहमदनगर यांच्याकडे निवेदन दिले. तरीही या पथकाने अद्याप कोणतीही कार्यवाही केली नाही. दळवी यांच्या मिळणाऱ्या पगारातून सोसायटीचे कर्जाचे हप्ते कपात होऊन अत्यंत तुटपुंजी रक्कम हातात येत आहे. त्यामुळे कुटुंबाची उपासमार होत आहे.